IMPIMP

Nitin Gadkari | ‘जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला…’, संसदीय बोर्डामधून गडकरींना वगळल्यानंतर काँग्रेसची भाजपवर खोचक टीका

by nagesh
 Nitin Gadkari | threatening phone calls again in nitin gadkaris office in nagpur 10 crore ransom demanded

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रातील एनडीए सरकारमधील (NDA Government) कार्यक्षम मंत्र्यांमध्ये रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. नितीन गडकरी यांच्या कामाचा वेग आणि त्यांची प्रशासनावर असलेली पकड या गोष्टींची नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. गडकरींच्या (Nitin Gadkari) कार्यक्षमतेचे अनेक दाखले देताना अनेकदा त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा (PM) सक्षम पर्याय म्हणून पाहिले जाते. त्यामुळे अशा कार्यक्षम मंत्र्यांचा सरकारमध्ये बोलबोला असं ही फार साहजिक बाब मानली जाते. परंतु भाजपने (BJP) नुकत्याच जाहीर केलेल्या पक्षाच्या संसदीय बोर्डामधून (Parliamentary Board) नितीन गडकरी यांना वगळ्यात आलं. हे पाहून अनेक राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या. याबाबत आता काँग्रेसने (Congress) खोचक शब्दात भाजपवर टीका केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बुधवारी भाजपाकडून पक्षाच्या संसदीय मंडळाची यादी जाहीर झाली.
यामधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांना वगळण्यात आल्याचे दिसून आले.
या यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (National President J.P. Nadda) यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi),
राजनाथ सिंह (Rajnath Singh), अमित शाह (Amit Shah), बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yeddyurappa), सर्बानंद सोनोवाल (Sarbananda Sonowal), के. लक्ष्मण (K. Laxman), इकबाल सिंह लालपुरा (Iqbal Singh Lalpura), सुधा यादव (Sudha Yadav), सत्यनारायण जटिया (Satyanarayan Jatia) आणि बी. एल. संतोष (B. L. Santosh) यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गडकरी आणि चौहान यांना वगळून त्यांच्याजागी नव्या मंडळात येडियुरप्पा आणि सोनोवाल यांना संधी दिली आहे.

 

 

भाजपच्या या निर्णयामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं असून काँग्रेसने नेमकं यावर बोट ठेवत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
यासंदर्भात काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ क्लिप शेअर करण्यात आली आहे.
या क्लिपसोबत पंतप्रधानपदाच्या दावेदारीमुळेच नितीन गडकरी यांना वगळ्यात आल्याची पोस्ट करण्यात आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.
नितीन गडकरींबाबत नेमकं हेच घडलंय’, असं या ट्विटमध्ये म्हटले आहे.
तसेच, व्हिडीओ क्लिपमधून देखील या मुद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

 

Web Title : – Nitin Gadkari | union minister nitin gadkari removed bjp parliamentery borad congress tweet targets bjp

 

हे देखील वाचा :

Pune Crime | नियंत्रण सुटल्याने डंपर खड्ड्यात कोसळून चालकाचा मृत्यु

Sanjay Raut | संजय राऊत वापरत होते बिल्डरच्या लक्झरी कार, ED च्या तपासात उघड

Pune Crime | डी फार्मसी केले नसताना खोटे सांगून केले लग्न; आता मेडिकल दुकान विकत घेण्यासाठी केला जात आहे विवाहितेचा छळ

 

Related Posts