IMPIMP

Osmanabad Police | आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; डोळ्यात चटणी टाकून पोलिसांना बेदम मारहाण; PSI जखमी

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

परांडा : सरकारसत्ता ऑनलाइनOsmanabad Police | आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या उस्मानाबाद पोलिसांच्या (Osmanabad Police) पथकाच्या डोळ्यात चटणी टाकून काठ्या, कुऱ्हाडीने मारहाण (Beating) करुन प्राणघातक हल्ला (Deadly Attack) केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक राजकुमार ससाणे (PSI Rajkumar Sasane) हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच पथकातील पोलीस (Police Squad) कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. ही घटना सोमवारी (दि.4) परांडा शहरापासून (Paranda City) काही अंतरावर असलेल्या कुर्डुवाडी रोडवरील पाटील वस्तीवर (Patil Vasti) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, औदुंबर प्रकाश पाटील (Audumbar Prakash Patil) यांच्या शेतीच्या वादातून गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलीस (Osmanabad Police) पथक पाटील वस्तीवर उमाकांत पाटील (Umakant Patil) याच्याकडे चौकशीसाठी गेले होते. चौकशी दरम्यान तपास अधिकारी राजकुमार ससाणे व उमाकांत पाटील यांच्यात बाचाबाची झाली. याचे रुपांतर हाणामारीत झाले. उमाकांत पाटील, कृष्णा उमाकांत पाटील, रामराजे उमाकांत पाटील, पल्लवी उमाकांत पाटील, मुकुंद उमाकांत पाटील, गोविंद उमाकांत पाटील यांनी अचानक पोलीस पथकावर कोयता, दगड, काठीने हल्ला केला.

 

 

पथकातील पोलीस कॉन्स्टेबल शबाना मुल्ला (Police Constable Shabana Mulla) यांनी या घटनेची माहिती परांडा पोलीस ठाण्यात (Paranda Police Station) दिली. पोलिसांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलीस ठाण्यातून पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस घटनास्थळी येताच पाटील कुटुंबाने पोलिसांच्या डोळ्यात चटणी फेकून दगडफेक केली. तर पोलीस उपनिरीक्षक ससाणे यांना घरात कोंडून काठी आणि कुऱ्हाडीने मारहाण केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दोन तासाच्या थरारानंतर ससणे पोलीस कर्मचारी अजित कवडे (Ajit Kavade),
योगेश यादव (Yogesh Yadav) यांची पाटील कुटुंबाच्या तावडीतून सुटका करण्यात आली.
या प्रकरणी पल्लवी उमाकांत पाटील, कृष्णा उमाकांत पाटील यांना ताब्यात घेतले आहे.
तर उर्वरित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत.
दरम्यान, जखमी पोलीस उपनिरीक्षक ससाणे आणि कर्मचाऱ्यांना उपचारासाठी
उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

 

Web Title : Osmanabad Police | osmanabad deadly attack on paranda police squad who went to arrest the accused

 

हे देखील वाचा :

ED Attached Sanjay Raut’s Property | ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

JK Terrorist Attack | काश्मीर खोऱ्यात 24 तासात 4 दहशतवादी हल्ले; जवान ठार, काश्मिरी पंडितासह 6 जखमी

BJP Vs Shivsena | शिवसेनेला झटका? ‘सेनेचे 14 खासदार संपर्कात तर 25 आमदार नाराज’; भाजपच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट !

 

Related Posts