IMPIMP

BJP Vs Shivsena | शिवसेनेला झटका? ‘सेनेचे 14 खासदार संपर्कात तर 25 आमदार नाराज’; भाजपच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट !

by nagesh
Maharashtra Politics | you were going to hit rahul gandhi with a shoes but came with a hug bjps reply to uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन BJP Vs Shivsena | राज्याच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र अशातच भाजप (BJP) नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे. प्रसाद लाड यांनी शिवेसेनेचे 14 खासदार संपर्कात आणि 25 आमदार नाराज असल्याचा दावा केला आहे. (BJP Vs Shivsena)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

तळमळतंय जळमळतंय असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सभागृहात म्हणाले होते. मात्र त्यांच्याच पक्षातील खासदारांची तळमळ जळमळ त्यांना दूर करता आली नाही. त्यावरचं चूर्ण आमच्याकडे असून लवकरच आम्ही ते देऊ असं म्हणत प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

 

 

शिवसेना नेत्यांना पालकमंत्री (Guardian Minister) दाद देत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनातील मळमळ दिसून येत आहे. जे खासदार आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याबद्दल योग्य वेळ की सांगू मात्र ती योग्य वेळ कधी येणार हे आम्ही सांगणार नसल्याचं प्रसाद लाड यांनी सांगितलं. यावेळी बोलताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी पाडव्यावेळी केलेल्या भाषणात राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे (Loudspeakers For Azaan) काढा, अशी भूमिका घेतली होती. या भूमिकेचं प्रसाद लाड यांनी स्वागत केलं. (BJP Vs Shivsena)

 

 

दरम्यान, मनसेने (MNS) घेतलेली हिंदुत्वाची भूमिका चांगली बाब आहे. तशी भूमिका पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) घेऊ शकतात का?, असा सवाल लाड यांनी केला आहे.
त्यासोबतच अजान आणि मशिदीवरील भोंग्यांबाबत बाळासाहेब ठाकरेंनी (BalasahebThackeray)
घेतलेली भूमिका शिवसेनेनी घेतली असल्याचं लाड म्हणाले.

 

 

Web Title : BJP Vs Shivsena | 14 shiv sena mps in touch with us claims bjp leader prasad lad

 

हे देखील वाचा :

High Temperature in Pune | पुणेकरांना वाढत्या तापमानाचा चटका ! ढगाळ हवामानामुळे रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता

ST Workers Strike | एसटी कामगारांचा संप मिटेना ! कमतरता भरून काढण्यासाठी ST महामंडळाने घेतला ‘हा’ निर्णय

IPS Deepak Pandey | लेटरबॉम्ब फोडणाऱ्या नाशिकच्या पोलिस आयुक्तांचा महसूल मंत्र्यांकडे माफीनामा; बाळासाहेब थोरात करणार CM ठाकरेंकडे तक्रार

 

Related Posts