IMPIMP

PAN-Aadhaar Link | SBI कडून 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! हे काम केलं नाही तर तुमची बँकिंग सेवा बंद होऊ शकते, जाणून घ्या

by nagesh
Digital Banking Fraud Alert | sbi alert for digital banking fraud online cyber crime helpline number

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन PAN-Aadhaar Link | देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) आपल्या 40 कोटी ग्राहकांना अलर्ट (SBI Alert) केले आहे. बँकेने खातेदारांनी 31 मार्च 2022 पूर्वी पॅन-आधार कार्ड लिंक (PAN-Aadhaar Link) करुन घेण्यासाठी वेळ दिला होता. जर ग्राहकांनी या मुदतीमध्ये तसे केले नाही तर त्यांची बँकिंग सेवा बंद (Banking services) होऊ शकते, असे बँकेने म्हटले आहे. एसबीआयने याबाबत ट्विटही केले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एसबीआयने म्हटले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांना सल्ला देतो की, कोणताही गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि अखंड बँकिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी त्यांचा पॅन आधारशी लिंक करावा. यासोबत पॅनला आधारशी लिंक करणे अनिवार्य असल्याचे बँकेने म्हटले आहे. पॅन आणि आधार लिंक नसल्यास, पॅन निष्क्रिय होईल आणि निर्दिष्ट व्यवहार करण्यासाठी पॅन वापरता येणार नाही. (PAN-Aadhaar Link)

 

कोरोना (Corona) विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पॅनला आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यत वाढवण्यात आली आहे.

 

पॅन-आधार कार्ड कसे लिंक करायचे

पहिली पद्धत
– प्रथम तुम्ही आयकर विभागाच्या (Income Tax Department) अधिकृत वेबसाईटवर जा https://www.incometaxindiaefiling.gov.in/home

– याठिकाणी डाव्या बाजूस तुम्हाला Link Aadhaar चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा

– एक नवीन पेज उघडेल, तिथे तुम्हाला पॅन, आधार आणि आधारमध्ये नमूद केलेले तुमचे नाव भरावे लागेल.

– जर तुमच्या आधार कार्डमध्ये फक्त जन्म वर्ष असेल, तर ‘माझ्याकडे आधार कार्डमध्ये फक्त जन्म वर्ष आहे’ या बॉक्सवर टिक करा.

– कॅप्चा कोड प्रविष्ट करा किंवा OTP वर टिक करा

– आधार बटणावर क्लिक करा, तुम्हाला पॅन आणि आधार लिंक मिळेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दुसरी पद्धत

तुम्ही एसएमएसद्वारे (SMS) पॅन आणि आधार लिंक करु शकता

– मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये टाईप करा – UIDPAN<12 अंकी आधार><10 अंकी पॅन>

– हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा. तुमचे काम होईल.

 

Web Title :- PAN-Aadhaar Link | aadhaar pan linked before 31 march 2022 otherwise will be problem in banking service pan aadhaar news sbi alert

 

हे देखील वाचा :

Hair Care Tips | थंडीत केसांची काळजी कशी घ्याल? वापरा या खास टिप्स, केसही उगवतील घनदाट !

Tata Sky | 18 वर्षानंतर बदलणार आहे DTH कंपनी टाटा स्कायचे नाव, आता Tata Play च्या नावाने ओळखली जाईल

Maharashtra School Reopen | 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरु होणार? राजेश टोपेंनी दिले स्पष्ट संकेत

 

Related Posts