IMPIMP

PAN-Aadhaar Linking | 1 जुलैनंतर पॅन-आधार लिंक करणे पडणार महागात, आत्ताच करा लिंक; जाणून घ्या सोपी पद्धत

by nagesh
PAN- Aadhaar Link | pan aadhaar link how to check status of pan card and aadhaar card status know process

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPAN-Aadhaar Linking | पॅन कार्ड (PAN Card) ला आधार (Aadhaar Card) लिंक (Link) करण्याची डेडलाईन 31 मार्च 2022 वरून वाढवून 31 मार्च 2023 केली होती. मात्र, आपले पॅन आपल्या आधारसोबत लिंक न करता चालू ठेवण्याची अंतिम मुदत 1 एप्रिल 2022 होती. म्हणजे आता पॅन – आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने 29 मार्च 2022 च्या नोटिफिकेशनमध्ये म्हटले होते की, आता पॅन – आधार लिंक केल्यास शुल्क भरावे लागेल. (PAN-Aadhaar Linking)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जर तुम्ही 30 जून 2022 ला किंवा त्यापूर्वी पॅन – आधार लिंक केले तर 500 रूपये शुल्क भरावे लागेल. 1 जुलै 2022 ला किंवा त्यानंतर पॅन – आधार लिंक केल्यास 1000 रूपये शुल्क भरावे लागेल. आता शुल्क वेळेनुसार विभागण्यात आले आहे.

 

ऑनलाइन असे करू शकता लिंक

सर्वप्रथम इन्कम टॅक्सची ऑफिशल साईट incometaxindiaefiling.gov.in वर जा.
तेथून लिंक आधार वर क्लिक करा.
नंतर क्लिक हिअर वर क्लिक करा.
खाली दिलेल्या बॉक्समध्ये पॅन, आधार नंबर, आपले नाव आणि दिलेला कॅप्चा टाइप करा.
सर्व बॉक्स भरल्यानंतर लिंक आधारवर क्लिक करा.
लक्षात ठेवण्यासारखे हे आहे की, नाव किंवा नंबरमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड करू नका. (PAN-Aadhaar Linking)

 

SMS ने असे करू शकता लिंक
एसएमएसद्वारे सुद्धा पॅनकार्डला आधारकार्डशी लिंक करता येते. यासाठी तुम्हाला UIDPAN<12digit Aadhaar><10digitPAN> फॉर्मेटमध्ये मेसेज लिहिून 567678 किंवा 56161 नंबरवर एसएमएस करावा लागेल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- PAN-Aadhaar Linking | linking pan aadhaar after july 1 to cost you more how to link pan with aadhaar step by step process

 

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी भर ! CBI ने दाखल केले आरोपपत्र

Sarkari Pension Scheme | एकदाच जमा करा पैसे, 60 व्या वयानंतर दरमहिना पेन्शनची गॅरंटी; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यात जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेकडून छापा, 12 जणांना अटक

 

Related Posts