IMPIMP

Parineeti Chopra | ‘आम्ही कोणालाच स्क्रिप्ट देत नाही’, रिअ‍ॅलिटी शोबद्दल परिणीती चोप्राची प्रतिक्रिया

by nagesh
Parineeti Chopra | parineeti chopra open up on reality show fix clean the air we dont give any script to anyone

सरकारसत्ता ऑनलाइन – परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) सध्या टेलिव्हिजनवरील एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे. ‘हुनरबाज: देश की शान’ (Hunarbaaz: Desh Ki Shaan) या शोमध्ये करण जोहर (Karan Johar) आणि मिथुन चक्रवर्तीसोबत ( Mithoon Chakrvarty ) ही अभिनेत्री शोमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. शोमध्ये कोणता स्पर्धक ठेवायचा की नाही, कोणाचा परफॉर्मन्स चांगला होता की नाही हे तिन्ही जज एकत्रितपणे ठरवतात. नुकताच या शोमधून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये परिणीती चोप्रा रडताना दिसत आहे, व्हिडिओमधील एका स्पर्धकाची गोष्ट ऐकून परिणीती खूप भावूक झाली. तेव्हाच त्याचे अश्रू बाहेर पडले. (Parineeti Chopra)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या शोवर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली की टीआरपीसाठी सर्व काही ठरलेले आहे. परिणीतीच्या भावनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अनेकांनी याला ‘भावनिक कथा आणि टीआरपी मिळवणे’ असे म्हटले.

 

 

 

आता यावर परिणीतीची (Parineeti Chopra) प्रतिक्रिया समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अभिनेत्री परिणीतीने म्हटले आहे की, ‘मला वाटते की अशा रिअ‍ॅलिटी शोशी काहीही संबंध नसलेले लोकच अशा गोष्टी करतात. मी तुम्हाला माझा अनुभव सांगत आहे, आम्ही कोणतीही स्क्रिप्ट देत नाही आणि काहीही बोलायला सांगत नाही. आम्ही त्या स्पर्धकांना यापूर्वी कधीही भेटलो नाही, जेव्हा ते स्टेजवर आमच्यासमोर येतात, तेव्हा त्यांच्या कामगिरीच्या आधारावर आणि ते काय सांगतात यावर आमच्या प्रतिक्रिया स्वाभाविकपणे येतात. मला वाटतं जर एखादी भावनिक कथा समोर येत असेल तर आपण ती का शेअर करत नाही ? प्रतिभा खोटी नसते. शोमध्ये ते सत्य वास्तव आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Parineeti Chopra | parineeti chopra open up on reality show fix clean the air we dont give any script to anyone

 

हे देखील वाचा :

Pune Corona Updates | चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 8300 पेक्षा जास्त नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Sachin Vaze-Anil Deshmukh | पोलिस खात्यातून बडतर्फ झालेला अधिकारी माजी गृहमंत्र्यांना सवाल विचारतो तेव्हा…; अनिल देशमुख म्हणाले….

Vitamin Deficiency Signs and Symptoms | सावधान ! ‘व्हिटॅमिन -ए’च्या कमतरेमुळे होऊ शकतात गंभीर आजार, दुर्लक्ष करू नका हे लक्षण

 

Related Posts