IMPIMP

Pune Railway Station | दिवाळीत प्रवाशांना पुणे रेल्वे स्टेशनवर येणे पडणार ‘महागात’; रेल्वे प्रशासनाचा नवा नियम

by nagesh
Pune Station platform ticket for rs 10 again at pune station reduced from earlier price 50

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Railway Station | पुणे रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाबाबत एक निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांना दिवाळीच्या काळात पुणे रेल्वे स्टेशनवर (Pune Railway Station) नातेवाइकांना सोडायला येणे आता महाग पडणार आहे. कारण, रेल्वे प्रशासनाने दिवाळीच्या पार्श्वभुमीवर प्लॅटफॉर्म (Platform Ticket) तिकिटाचे दर 10 रुपयांहून वाढवून 30 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवाळीत होणारी गर्दी लक्षात घेता याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे प्रशासनाच्या (Pune Railway Station Administration) नव्या निर्णयानुसार 25 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरच्या काळात प्लॅटफॉर्म तिकीट 30 रुपये करण्यात आलं आहे. दिवाळीच्या कालावधीत रेल्वे प्लॅटफॉर्मवर कमीत कमी गर्दी व्हावी याकरिता हा निर्णय घेतला आहे. तसेच, 10 नोव्हेंबरनंतर पुन्हा प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपये केले जाणार आहे. अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून  देण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

दरम्यान, सध्या पुणे स्थानकावर रोज दीड हजारहून अधिक प्रवासी प्लॅटफॉर्म तिकीट काढत आहेत. त्याचबरोबर सध्या पुण्यातून निघणाऱ्या बहुतांश रेल्वे
गाड्यांना रिग्रेट लागला आहे. तसेच वेटिंग सीट देखील उपलब्ध नाहीत. त्यामुळे या काळात स्टेशनवर गर्दी होण्याची शक्यता असल्याने रेल्वे प्रशासनाने
हा निर्णय घेतला आहे. तसेच प्रवाशांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर काळजी घेऊन प्रवास करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

 

Web Title: passengers platform ticket pune railway station goes rs 10 to rs 30 in diwali

 

हे देखील वाचा :

Crime News | धक्कादायक ! पतीने पसंतीचा शर्ट शिवला नाही म्हणून पत्नीने गळफास घेऊन संपवलं जीवन

Gratuity Funds | PF खात्यावर आता किती मिळेल व्याज, 1 ऑक्टोबरपासून आले नवीन रेट; जाणून घ्या

Cryptocurrency | 500 रुपयांत सुद्धा Bitcoin मध्ये करू शकता खरेदी, विक्रमी स्तरावर आहे दर

 

Related Posts