IMPIMP

Pune Crime | शारीरीक संबंधाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी ! विमाननगर परिसरातील रो हाऊस विकायला लावून महिलेचे केले आर्थिक शोषण; वडिलांच्या मित्रानेच दाखवलं काम

by nagesh
Pune Crime | Threatening to make a Physical Relation video viral! Financial exploitation of women by selling row houses in Vimannagar area Rape Case In Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | वडिलांच्या मित्राबरोबर असलेल्या प्रेमसंबंधातून त्याने साथीदाराच्या मदतीने शरीरसंबंधाचा व्हिडिओ (Physical Relation Video) काढला तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने रो हाऊस (Row House In Pune) जबरदस्तीने विकायला भाग पाडला. त्याचे आलेले पैसे हडप करुन महिलेचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण (Rape In Pune) करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी फुलेनगर येथे राहणार्‍या एका ४० वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पुरुषोत्तम लाल बुटाणी Purushottam Lal Butani (रा. खेसेपार्क, लोहगाव), वासुदेव पाटील Vasudev Patil (रा. खेसेपार्क, लोहगाव) यांच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. हा प्रकार २०१२ पासून सुरु होता.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम बुटाणी हा फिर्यादी यांच्या वडिलांचा मित्र असून त्याचे व फिर्यादी यांचे २०१२ पासून प्रेमसंबंध आहेत. त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे येणे होते. बुटाणी याने फिर्यादी यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांच्या बरोबर शरीरसंबंध निर्माण केले. वासुदेव पाटील याने या दोघांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दोघांनी फिर्यादी यांच्या नावावर असलेली रो हाऊसची मालमत्ता विकण्यास जबरदस्तीने भाग पाडले. ती विकून आलेले पैसे फिर्यादीस न देता त्यांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जोगन तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Threatening to make a Physical Relation video viral! Financial exploitation of women by selling row houses in Vimannagar area Rape Case In Pune

 

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पिंपरीतील संतापजनक घटना ! शिक्षकाकडून नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Pune NCP Protests Against Girish Bapat | पाणी प्रश्नाकडे खासदार गिरीश बापट यांचे सोयीस्करपणे दुर्लक्ष, राष्ट्रवादीचे खा. बापट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन

PAN-Aadhaar Link करण्याची शेवटची तारीख पुढील वर्षापर्यंत वाढवली ! परंतु ‘मोफत सेवा’ आता बंद; आता लागतील ‘इतके’ पैसे

Ajit Pawar | महाराष्ट्र पुर्णपणे निर्बंध मुक्त होणार का ?; अजित पवारांचं महत्त्वपूर्ण विधान

 

Related Posts