IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 55 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | Great relief One digit number of corona patients in Pimpri Chinchwad know other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज (सोमवार) कोरोनाच्या (Pimpri Corona) नविन रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 55 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 55 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 74 हजार 231 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 43 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 69 हजार 611 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरात 904 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 904 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 03 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4447 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Pimpri Corona)

 

दिवसभरात 10,763 जणांचे लसीकरण

सोमवारी (दि.04) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 10 हजार 763 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 20 लाख 21 हजार 111 जणांना लस देण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title : Pimpri Corona | 55 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Anti Corruption | 20 हजाराची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला अँटी करप्शनकडून अटक

Chandrakant Patil | ‘…तर विधानसभेला शिवसेनेच्या फक्त 5 जागा आल्या असत्या’

Amitabh Bachchan Caller Tune | कोविड-19 कॉलर ट्यूनने तुम्हाला थकवलेय का? जाणून घ्या तात्काळ बंद करण्याची प्रक्रिया

 

 

Related Posts