IMPIMP

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 54 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Updates | Anxiety increased More than 2000 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 41 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 01 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 2628 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 41 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 76 हजार 283 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 54 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 72 हजार 031 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Pimpri Corona)

 

शहरात 493 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

 

शहरामध्ये सध्या 493 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात हद्दीबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णांचा मृत्यू झालेल नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4490 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 9019 जणांचे लसीकरण

 

मंगळवार (दि.02) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 9019 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 23 लाख 35 हजार 657 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Pimpri Corona | Comfortable! Discharge of 54 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | येरवडा कारागृहातून सुटल्यानंतर दुचाकी रॅली काढणं पडलं महागात, गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Pune Corporation | 24 तास पाणी पुरवठा योजना : 5 वर्षात ८४ पैकी केवळ ३५ पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण

Gold Price Today | धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत झाली मोठी घसरण ! आता 28024 रुपयात मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा नवीन दर

 

Related Posts