IMPIMP

PM Jan Dhan Yojana (PMJDY) | बँक खात्यात पैसे नसले तरी देखील वेळप्रसंगी मिळतील 10 हजार रुपये; जाणून घ्या योजना

by nagesh
PM Jan Dhan Yojana (PMJDY) | pradhan mantri jandhan yojana pmjdy heres how to avail rs 10000 overdraft facility

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Jan Dhan Yojana (PMJDY) | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) प्रधानमंत्री जन धन योजना PM Jan Dhan Yojana (PMJDY) सुरु केली. 18 ऑगस्ट 2021 पर्यंत प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत 43 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. असं वित्त मंत्रालयाचं (Ministry of Finance) म्हणणं आहे. या योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यात खातेधारकांना अनेक सुविधा मिळतात. उघडलेल्या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची अट नाही. तुमच्या खात्यात शिल्लक नसली तरी देखील आता 10 हजार रुपये काढु शकणार. याचबरोबर खातेदाराला रुपे डेबिट कार्ड (Rupay Debit Card) आणि ओव्हरड्राफ्ट (Overdraft Service) देण्याची अतिरिक्त सुविधा देखील दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

खातेदाराच्या खात्यात शिल्लक नसेल तरी देखील 10 हजार रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध आहे.
ही सुविधा कमी मुदतीच्या कर्जासारखी आहे.
याआगोदर ही रक्कम पाच हजार रुपये होती. सरकारने ती आता 10 हजारांपर्यंत वाढवलीय.
पण, ही सुविधा खाते उघडल्यानंतर काही महिन्यांनी मिळते.
या खात्यातील ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 65 वर्षे आहे.

 

दरम्यान, ओव्हरड्राफ्ट (Overdraft) सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपले जन धन खाते कमीत कमी सहा महिने जुने असावे.
नाहीतर केवळ 2 हजार रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध असणार आहे.
या दरम्यान, योजना यशस्वी व्हावी यासाठी सरकारने 28 ऑगस्ट 2018 नंतर उघडल्या जाणार्‍या अशा जन धन खात्यांसह अपघाती विम्याची रक्कम दोन लाख इतकी वाढवलीय, ही याआगोदर एक लाख होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

असे उघडा जन धन खाते –
एका हिंदी वेबसाईटच्या वृत्तानुसार, प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत (PM Jan Dhan Yojana (PMJDY) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जास्त खाते उघडले जाते.
परंतु, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचे जन धन खाते खासगी बँकेतही उघडू शकता.
जर तुमचे दुसरे बचत खाते असेल तर तुम्ही ते जन धन खात्यामध्ये बदलू शकता.
भारतात कोणताही नागरिक ज्याचे वय दहा वर्ष अथवा त्याहून जास्त आहे. तो जन धन खाते उघडू शकतो.

 

Web Title :- PM Jan Dhan Yojana (PMJDY) | pradhan mantri jandhan yojana pmjdy heres how to avail rs 10000 overdraft facility

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

FDA Pune | पुणे विभागातील 392 औषध दुकानांचे परवाने निलंबित, 105 दुकानांना टाळे; अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

MSEDCL | राज्यावर वीज संकट? गुजरातची कंपनी म्हणते आधी 120 कोटींची थकबाकी द्या तरच वीज देऊ

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे मनपातील सहायक आयुक्त सचिन तामखेडेच्या घरी सापडली साडेनऊ लाखांची कॅश, आज न्यायालयात करणार हजर

 

Related Posts