IMPIMP

PM Kisan 11th Installment Update | पीएम किसान योजनेचा बदलला नियम, 31 मार्चच्या अगोदर करा ‘हे’ काम; अन्यथा मिळणार नाहीत पैसे

by nagesh
PM Kisan 11th Installment Update | pm kisan yojana rules change do this work before march 31 otherwise you will not get money

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPM Kisan | पीएम किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता (PM Kisan 11th Installment Update) येणार आहे. याची कोट्यवधी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या योजनेशी संबंधित एक नियम बदलला आहे. आता या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार देखील अपडेट करावे लागेल. हे ई – केवायसी किंवा आधार अपडेट करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. याआधी, तुम्हाला तुमचे आधार अपडेट (Aadhaar Update) करावे लागेल अन्यथा 11 वा हप्ता येणार नाही. (PM Kisan 11th Installment Update)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने म्हटले की, पेमेंटची पद्धत आता अकाऊंट मोडवरून आधार मोडमध्ये बदलली जाणार आहे. त्यामुळे आधार अपडेट करणे आवश्यक आहे. 12 कोटींहून अधिक शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेत सहभागी झाले आहेत. पीएम किसान पोर्टलवर ई – केवायसी (e-KYC For PM Kisan) सुरू झाले आहे. पुढील हप्ता कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळवायचा असेल तर 31 मार्चपर्यंत हे काम नक्की पूर्ण करा.

 

अशी पूर्ण करा ई – केवायसी

यासाठी सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.

उजव्या बाजूला सर्वात वर eKYC लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.

AADHAAR क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.

आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर एंटर करा आणि ओटीपा टाका.

सर्व काही ठीक झाले तर eKYC पूर्ण होईल अन्यथा Invalid येईल.

असे झाल्यास तुमचा हप्ता अडकू शकतो. तुम्ही ते आधार सेवा केंद्रावर दुरुस्त करून घेऊ शकता.

 

12.48 कोटीहून जास्त शेतकरी रजिस्टर्ड
देशातील 12.48 कोटीहून अधिक शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणीकृत आहेत. 10 व्या हप्त्यासह डिसेंबर – मार्चचा हप्ता आता उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात 31 मार्चपर्यंत येत राहील. पीएम किसान पोर्टलवर दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ही रक्कम 10.22 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. अजूनही कोट्यवधी शेतकरी यापासून वंचित आहेत. (PM Kisan 11th Installment Update)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी 2000 – 2000 च्या तीन हप्त्यांमध्ये शेतकर्‍यांच्या खात्यात 6000 रुपये थेट ट्रान्सफर करते.
आतापर्यंत सरकारने 10 हप्ते जारी केले आहेत आणि 11 व्या हप्त्यासाठी 12 कोटींहून अधिक नोंदणीकृत शेतकरी प्रतीक्षेत आहेत.
यावेळी पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता शेतकर्‍यांना eKYC करावे लागेल.

 

Web Title :- PM Kisan 11th Installment Update | pm kisan yojana rules change do this work before march 31 otherwise you will not get money

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खळबळजनक ! पोलिसाकडून शिक्षिकेवर बलात्कार

Gallbladder Stone | गॉलब्लॅडर स्टोनकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपचाराने करू शकता ठिक; जाणून घ्या

Sambhaji Raje Chhatrapati | संभाजी राजेंची प्रकृती खालावली; मराठा आरक्षणासाठी 3 दिवसांपासून करताहेत उपोषण

Gold-Silver Price Today | ‘सोने-चांदी’चे दर वधारले, सोने पुन्हा 51 हजारांवर तर चांदी 1 हजारांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

 

Related Posts