IMPIMP

Sambhaji Raje Chhatrapati | संभाजी राजेंची प्रकृती खालावली; मराठा आरक्षणासाठी 3 दिवसांपासून करताहेत उपोषण

by nagesh
Sambhaji Raje Chhatrapati | For maratha reservation hunger strike sambhaji raje chhatrapati health updates sugar blood pressure decreased

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमागील तीन दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) मराठा आरक्षणासाठी
(Maratha Reservation) आझाद मैदानावर (Azad Maidan) उपोषणाला बसले आहेत. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati)
यांचा आजचा उपोषणाचा (Hunger Strike) तिसरा दिवस आहे. काल (रविवारी) जेजे हॉस्पिटलमधील (JJ Hospital) चार डॉक्टरांच्या पथकाने त्यांची
तपासणी केली होती. त्यावेळी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले होते. मात्र, आज त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांची शुगर
(Sugar) कमी होत असल्याचं समजतंय. संभाजीराजे यांच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी ही माहिती दिली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांचे ब्लड प्रेशर (Blood Pressure), शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांना
आम्ही इंजेक्शन (Injection) घेण्यास सांगितले आहे. मात्र ते इंजेक्शन घेण्यास देखील तयार नाहीत, असं डॉक्टरांनी सांगितलं. तसेच त्यांनी लवकरात
लवकर ट्रिटमेंट घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.

 

 

 

डॉक्टर म्हणाले, गेल्या 60 तासांपासून ते आमरण उपोषण करत आहेत. त्यांची शुगर आणि ब्लड प्रेशर कमी झाले आहे. तसेच हृदयाचे ठोके (Heartbeat) वेगाने पडत आहेत. आम्ही शुगर लेव्हल वाढवण्यासाठी त्यांना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. मात्र ते उपोषणावर असल्यानं त्यांनी ते देखील घेण्यास नकार दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कालपासून संभाजीराजे यांना डोकेदुखीचा त्रास होऊ लागला आहे.
त्यांना कालच सलाईन लावण्याचा सल्ला दिला.
परंतु त्यांनी सलाईन लावून घेण्यास नकार दिला. कोणत्याही प्रकारची औषधे घेण्यास संभाजीराजे यांनी नकार दिल्याचे समजते.

 

Web Title :- Sambhaji Raje Chhatrapati | For maratha reservation hunger strike sambhaji raje chhatrapati health updates sugar blood pressure decreased

 

हे देखील वाचा :

Gold-Silver Price Today | ‘सोने-चांदी’चे दर वधारले, सोने पुन्हा 51 हजारांवर तर चांदी 1 हजारांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

New Children Money Back Plan | LIC ची ही स्कीम तुमच्या मुलांचे भविष्य करते सुरक्षित, 150 रुपयांच्या गुंतवणुकीवर देईल 19 लाखांची रक्कम

Russia Ukraine War | गोठविणार्‍या थंडीत 10 किमीचा पायी प्रवास करुन गाठले रोमानिया; युक्रेनमधून पुण्यातील 9 विद्यार्थीनी सुखरुप परतल्या

 

Related Posts