IMPIMP

Gold-Silver Price Today | ‘सोने-चांदी’चे दर वधारले, सोने पुन्हा 51 हजारांवर तर चांदी 1 हजारांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

by nagesh
Gold Price Today | gold price drop and silver price rise 8 august

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनरशिया – युक्रेन युद्धाच्या (Russia – Ukraine War) पार्श्वभूमीवर भांडवली बाजारात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. या संकटादरम्यान गुंतवणुकदार सुरक्षित गुंतवणूक (Secure Investment) म्हणून सोन्यात गुंतवणूक करत आहेत. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी कमोडिटी बाजार (Commodity Market) सोन्याचा (Gold-Silver Price Today) भाव तब्बल 800 रुपयांनी वाढला आणि तो 51 हजारांवर गेला. चांदीमध्ये देखील आज एक हजार रुपयांची वाढ (Gold-Silver Price Today) झाली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सोने – चांदीला नफेखोरीचा फटका
सध्या MCX वर सोन्याचा भाव (Gold – Silver Price Today) 50,940 रुपये इतका आहे. त्यात 719 रुपयांची वाढ झाली. तत्पूर्वी सोन्याचा भाव 51 हजार 219 रुपयापर्यंत वाढला. चांदीमध्ये देखील 1043 रुपयांची वाढ झाली असून सध्या एक किलो चांदीचा भाव 65 हजार 948 रुपये इतका आहे. कमोडिटी बाजारात शुक्रवारी सोने आणि चांदीला नफेखोरीचा फटका बसला होता. बाजार बंद होताना सोने 1273 रुपयांनी स्वस्त झाले आणि सोन्याचा भाव 50 हजार 270 रुपयांवर स्थिरावला होता. चांदीमध्ये 1948 रुपयांची घसरण झाली आणि चांदीचा भाव 64 हजार 950 रुपयांवर स्थिरावला होता.

 

प्रमुख शहरातील सोने – चांदीचे भाव
Goodreturns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत (Mumbai) 22 कॅरेट सोन्याचा भाव (22 Carat Gold Price) 47000 रुपये इतका वाढला आहे. त्यात शुक्रवारच्या तुलनेत 660 रुपयांची वाढ झाली. आज 24 कॅरेटचा भाव 51,280 रुपये इतका झाला. त्यात 720 रुपयांची वाढ झाली. दिल्ली सरफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 47 हजार रुपये इतका आहे. दिल्लीत (Delhi) 24 कॅरेटचा सोन्याचा भाव 51,280 रुपये एवढा वाढला. चेन्नईत (Chennai) 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 48,160 रुपये इतका असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,500 रुपये झाला. त्यात 810 रुपयांची वाढ झाली. कोलकात्यात (Kolkata) आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 47 हजार असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,280 रुपये इतका आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जागतिक बाजार सोन्याचे दरात पडझड
जागतिक कमॉडिटी बाजारात (Global Commodity Market) देखील सोन्याच्या किमतीत मोठी पडझड झाली.
स्पॉट गोल्डचा (Spot Gold) भाव 1909.89 डॉलरपर्यंत वाढला आहे.
त्यात आज 1 टक्का वाढ झाली. मागील आठवड्यात रशिया – युक्रेन युद्धामुळे गुरुवारी सोन्याचा भाव 1975 डॉलरपर्यंत वाढला होता.
त्यानंतर नफावसुली झाल्याने सोने दरात घसरण झाली होती. महिनाभरात जागतिक पातळीवर सोन्याच्या किमतीत 6 टक्के वाढ झाली आहे.

 

Web Title :- Gold-Silver Price Today | gold price silver rates today 28th february 2022 gold price

 

हे देखील वाचा :

New Children Money Back Plan | LIC ची ही स्कीम तुमच्या मुलांचे भविष्य करते सुरक्षित, 150 रुपयांच्या गुंतवणुकीवर देईल 19 लाखांची रक्कम

Russia Ukraine War | गोठविणार्‍या थंडीत 10 किमीचा पायी प्रवास करुन गाठले रोमानिया; युक्रेनमधून पुण्यातील 9 विद्यार्थीनी सुखरुप परतल्या

Pune Crime | पुण्यात अवैध धंदे चालु देण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी-अंमलदार Protection Money स्वरूपात पैसे स्विकारताहेत; अति वरिष्ठांनी करून दिली मुंबईतील व.पो.नि. विरूध्दच्या खंडणीच्या गुन्ह्याची आठवण

 

Related Posts