IMPIMP

Gallbladder Stone | गॉलब्लॅडर स्टोनकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपचाराने करू शकता ठिक; जाणून घ्या

by nagesh
Gallbladder Stone | gallbladder sone do not take gallbladder stone lightly it can be cured with home remedies

सरकारसत्ता ऑनलाइन – पित्ताशयाच्या थैलीत तयार होणार गॉलस्टोन (Gallbladder Stone) हे छोटे खडे असतात. पित्ताशयात तयार झालेले खडे लिव्हरच्या (Liver) खाली असतात. ते खूप वेदनादायक असू शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गॉलब्लॅडरमधील खड्यांवर (Gallbladder Stone) वेळीच उपचार न केल्यास ते काढण्यासाठी ऑपरेशन करावे लागू शकते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पित्ताशयात कोलेस्टेरॉल (Cholesterol) साचल्यामुळे किंवा ते सुकल्याने स्टोनची तक्रार (Stone Problem) होते. अशा स्थितीत रुग्णाला असह्य वेदनांचा सामना करावा लागतो आणि त्यासोबतच अन्न पचण्यातही समस्या (Digestive Problems) निर्माण होते.

 

गॉलब्लॅडर आणि लिव्हर यांच्यामध्ये बाईल डक्ट (Bile Duct) नावाची एक छोटी नलिका असते, ज्याद्वारे ती गॉलब्लॅडरमध्ये पित्त घेऊन जाते. जेव्हा एखादी व्यक्ती जेवते, तेव्हा हे ब्लॅडर पित्ताला पिचकारी प्रमाणे खेचून लहान आतड्याच्या वरच्या भागात (Gallbladder Stone) पाठवते, ज्याला ड्युओडेनियम (Duodenum) म्हणतात. पित्त तिथे जाताच पचन सुरू होते.

 

पित्ताशयातील पित्तामधील अतिरिक्त कोलेस्टेरॉल एंजाइम विरघळत नाहीत, ज्यामुळे ते कडक होऊन दगडाचा आकार घेते. पित्तामध्ये भरपूर बिलीरुबिन (Bilirubin) असते. लिव्हरच्या सिरोसिसमुळे किंवा रक्ताच्या काही विकारांमुळे पुढे ते स्टोन होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गॉलब्लॅडर स्टोन तयार होण्याची कारणे (Gallstones Causes) –
गॉलब्लॅडर स्टोन तयार होण्याची कोणतीही स्पष्ट कारणे सध्या उपलब्ध नाही.
तसेच, ते होण्याचे कोणतेही ठराविक वय नाही. पण काही कारणे आहेत
ज्यामुळे गॉलब्लॅडरमध्ये स्टोन होण्याची शक्यता वाढू शकते जसे की, मधुमेह (Diabetes), लठ्ठपणा (Obesity),
गर्भधारणा (Pregnancy), बॅरिएट्रिक सर्जरीनंतर (Bariatric Surgery) किंवा काही औषधे घेतल्यानंतर ही समस्या होऊ शकते.

 

याशिवाय ब्रेड, रस्क आणि इतर बेकरी पदार्थ (Bakery Products)
इत्यादींच्या सेवनाचा पित्ताशयाच्या आरोग्यावर परिणाम (Effects On Gallbladder Health) होतो.
या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड (Saturated) आणि ट्रान्स फॅटचे (Trans Fat) प्रमाण खूप जास्त असते
आणि यापैकी बहुतेक पदार्थ मैद्यापासून बनवले जातात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गॉलब्लॅडर स्टोनवर घरगुती उपाय (Home Remedies For Gallbladder Stone) –

आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे (Proper Diet) .

गाजर आणि काकडीचा रस (Carrot, Cucumber Juice), लिंबाचा रस (Lemon Juice), नाशपाती (Pears) फायदेशीर आहेत.

फळे (Fruits) किंवा व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) शी संबंधित औषधे घेऊ शकता.

अधिकाधिक हिरव्या भाज्या (Green Vegetables) खा.

आंबट फळांचे सेवन (Intake Sour Fruit) करा.

तळलेले पदार्थ (Fried Foods), प्रक्रिया केलेले अन्न (Processed Food), अल्कोहोल (Alcohol),
सिगारेट (Alcohol), चहा (Tea), कॉफी (Coffee) आणि साखरयुक्त पेये टाळा.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Gallbladder Stone | gallbladder sone do not take gallbladder stone lightly it can be cured with home remedies

 

हे देखील वाचा :

Sambhaji Raje Chhatrapati | संभाजी राजेंची प्रकृती खालावली; मराठा आरक्षणासाठी 3 दिवसांपासून करताहेत उपोषण

Gold-Silver Price Today | ‘सोने-चांदी’चे दर वधारले, सोने पुन्हा 51 हजारांवर तर चांदी 1 हजारांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

New Children Money Back Plan | LIC ची ही स्कीम तुमच्या मुलांचे भविष्य करते सुरक्षित, 150 रुपयांच्या गुंतवणुकीवर देईल 19 लाखांची रक्कम

 

Related Posts