IMPIMP

PM Pension Yojana | जेष्ठ नागरीकांसाठी केंद्र सरकारची बेस्ट पेन्शन योजना ! 1.1 लाख रूपये मिळणार, जाणून घ्या

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission huge increase in the basic salary of government employees due to the fitment factor

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Pension Yojana | केंद्रातील मोदी सरकार (Central Government) अनेक वेगवेगळ्या योजना आणत असते. आता सरकारने जेष्ठ नागरीकांसाठी (Senior Citizens) देखील एक महत्वाची माहिती आणली आहे. केंद्र सरकारकडून 60 वर्षांवरील नागरीकांसाठी ‘पीएम वय वंदना योजना’ (PM Vaya Vandana Yojana) सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जेष्ठ नागरीकांना 1,11,000 रुपयांपर्यंत पेन्शन (PM Pension Yojana) मिळू शकणार आहे. या योजनेमुळे जेष्ठ नागरीकांना एक दिलासा मिळाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनाच्या निर्णायक टप्प्यावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ‘पीएम वय वंदना योजना’ (PM Vaya Vandana Yojana) सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा कालावधी 31 मार्च 2020 पर्यंत होता, मात्र आता तो मार्च 2023 पर्यंत वाढवला गेला आहे. दरम्यान, या योजनेत एखादी व्यक्ती अधिकाधिक 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते. ही योजना चालवण्याची जबाबदारी आयुर्विमा महामंडळावर (LIC) सोपवण्यात आलीय. या योजनेत पेन्शनसाठी, तुम्हाला एकरकमी रक्कम गुंतवावी लागणार आहे. त्यानंतर मग तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही अथवा वार्षिक पेन्शनची निवड करू शकणार आहे. (PM Pension Yojana)

 

 

कोणाला मिळणार लाभ ?
पीएम वय वंदना योजनेत सामील होण्यासाठी कमीत कमी वय 60 वर्षे आहे. म्हणजेच 60 वर्षे अथवा त्याहून अधिक वयाचे नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. या अंतर्गत कमाल वयोमर्यादा नाही.

 

 

वर्षाला एवढी मिळणार पेन्शन ?
पीएम वय वंदना योजनेंतर्गत प्रतिमहिना 1 हजार रुपये पेन्शनसाठी 1,62,162 रुपये गुंतवावे लागतील. या योजनेंतर्गत, कमाल मासिक पेन्शन 9,250 रुपये, तिमाही 27,750 रुपये, सहामाही पेन्शन 55,500 रुपये आणि वार्षिक पेन्शन 1,11,000 रुपये आहे.

 

 

कर सवलत –
पीएम वय वंदना योजनेला सेवा कर (Service Tax) आणि जीएसटीमधून (GST) सवलत देण्यात आली.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही गंभीर आजाराच्या किंवा जोडीदाराच्या उपचारासाठी हे पैसे वेळेपूर्वी काढू शकता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कागदपत्रे –
पीएम वय वंदना योजनेतील गुंतवणुकीसाठी तुमच्याजवळ पॅन कार्ड, ॲड्रेस प्रूफ आणि बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची कॉपी असणे बंधणकारक आहे.

 

 

कर्जाची सुविधा –
या योजनेत तुमच्यासाठी कर्जाची सुविधा देखील आहे. यात तुम्ही पॉलिसीच्या 3 वर्षानंतर पीएम वय वंदना योजनेवर कर्ज घेऊ शकता.
कर्जाची कमाल रक्कम खरेदी किमतीच्या 75 टक्के पेक्षा अधिक असू शकत नाही.
ही योजना सरकारच्या इतर पेन्शन योजनांप्रमाणे कर लाभ देत नाही.

 

 

सविस्तर माहितीसाठी –
पीएम वय वंदना योजनेबद्दल सविस्तर माहितीसाठी तुम्ही 022-67819281 किंवा 022-67819290 नंबरवर कॉल करू शकता.
याशिवाय, तुम्ही टोल-फ्री नंबर – 1800-227-717 देखील डायल करू शकता.

 

 

Web Title :-  PM Pension Yojana | pm pension yojana know pm vaya vandana yojana feature and benefits see here what to do

 

हे देखील वाचा :

Pune Crime | आजारी मालकाचा गैरफायदा घेत ड्रायव्हरने केली 51 लाखांची फसवणूक; पुण्याच्या कोंढव्यातील धक्कादायक घटना

Railway Rules | रात्रीच्या प्रवासाबाबत रेल्वेने बनवले नवीन नियम, ‘हे’ कृत्य केल्यास होणार मोठी कारवाई; जाणून घ्या

Coronavirus Omicron Infection | एखाद्या संक्रमित व्यक्तीला न भेटताही असे होऊ शकता कोविड पॉझिटिव्ह, जाणून घ्या कारणे

 

Related Posts