IMPIMP

Railway Rules | रात्रीच्या प्रवासाबाबत रेल्वेने बनवले नवीन नियम, ‘हे’ कृत्य केल्यास होणार मोठी कारवाई; जाणून घ्या

by nagesh
Railway Rules | railway has made new rules regarding travel at night action will be taken on doing

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाRailway Rules | रात्री ट्रेनमध्ये प्रवास करताना डब्यातील कोणीतरी मोबाईलवर मोठमोठ्या आवाजात संगीत वाजवतो, फोनवर जोर-जोरात बोलतो किंवा रात्री 10 वाजून गेल्यानंतरही लाईट चालू ठेवतो, तेव्हा प्रवाशांना त्रास होतो. मात्र, आता रेल्वे प्रवाशांना अशा समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. रात्रीचा रेल्वे प्रवास अधिक आरामदायी आणि आनंददायी करण्यासाठी रेल्वे बोर्डाने (Indian Railways) सर्व विभागीय रेल्वेंना निर्देश दिले आहेत. (Railway Rules)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मीडिया रिपोर्टनुसार, रेल्वेकडे अशा अनेक तक्रारी येत होत्या. पण याबाबत कोणताही नियम नव्हता. आता प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. अशी कोणतीही तक्रार आल्यावर तात्काळ कारवाई केली जाईल, असा निर्णय रेल्वेने घेतला आहे. नियम मोडणार्‍यांवर कारवाई केली जाईल आणि रेल्वे कर्मचार्‍यांची जबाबदारीही निश्चित केली जाऊ शकते.

 

 

रात्री 10 नंतर, रेल्वेने ही मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत :

कोणताही प्रवासी फोनवर मोठ्या आवाजात बोलणार नाही किंवा मोठ्या आवाजात संगीत ऐकणार नाही, ज्यामुळे सहप्रवाशांना त्रास होईल.

नाईट लॅम्प वगळता इतर सर्व दिवे रात्री बंद करावे लागतील.

गटाने प्रवास करणार्‍या प्रवाशांना यापुढे रात्री उशिरापर्यंत ट्रेनमध्ये बोलता येणार नाही. सहप्रवाशाच्या तक्रारीवरून कारवाई होऊ शकते. (Railway Rules)

तपासणी कर्मचारी जसे TTE, RPF कर्मचारी, इलेक्ट्रिशियन, खानपान कर्मचारी आणि देखभाल कर्मचारी रात्री शांततेने त्यांचे काम करतील जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही.

रेल्वे कर्मचारी 60 वर्षांवरील वृद्ध, अपंग आणि अविवाहित महिलांना तात्काळ मदत करतील.

 

 

Web Title :-  Railway Rules | railway has made new rules regarding travel at night action will be taken on doing

 

हे देखील वाचा :

Coronavirus Omicron Infection | एखाद्या संक्रमित व्यक्तीला न भेटताही असे होऊ शकता कोविड पॉझिटिव्ह, जाणून घ्या कारणे

Pune Crime | सराईत गुंडाचा चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर चाकूहल्ला; पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातील घटना

Rajesh Tope | घाबरू नका ! पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवावं – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Pune Crime | पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात; 3 वाहनांची धडक, 5 जण ठार

 

Related Posts