IMPIMP

PMC Employees News | बोनस व सानुग्रह अनुदान जमा झाल्याने पालिका कर्मचाऱ्यांची ‘दिवाळी’ सुरू

by nagesh
Pune PMC Property Tax | Pune Municipal Corporation PMC Collects Property Tax of 939 crore in the first two months

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन महापालिका (Pune Corporation) अधिकारी व कर्मचाऱ्यांचा (PMC Employees News) बोनस व सानुग्रह अनुदान गुरुवारी (दि.28) रात्री त्यांच्या बँकेत जमा करण्यात आला आहे. दिवाळी बोनस (Diwali bonus) आणि सानुग्रह अनुदान बँक खात्यात जमा झाल्याने अधिकारी आणि कर्मचारी (PMC Employees News) यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. महापालिकेकडून बोनस जाहीर करण्यात आला होता. मात्र, बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. मात्र आता बोनसची रक्कम जमा झाल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

सर्वसाधारण सभेने (PMC General Body Meeting) कोविड काळात उत्तम सेवा बाजावल्याने कर्मचाऱ्यांना तीन हजार रुपये बक्षीसही ‘दिवाळीनंतर’
मिळणार असल्याने कर्मचारी (PMC Employees News) हवालदिल झाले होते. एकीकडे विकासाच्या नावाखाली कोट्यवधींच्या प्रस्तावाना ‘धडाधड’
मंजुरी दिली जात असताना कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन आणि बोनस द्यायला पैसे ‘शिल्लक नाहीत’ ? असा सवाल विशेषतः मोठ्या प्रमाणावरील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला होता. परंतु आता बोनस व सानुग्रह अनुदान जमा झाल्याने पालिका कर्मचाऱ्यांचा ‘दिवाळी’ला सुरूवात झाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दिवाळीचा बोनस, सानुग्रह अनुदान आणि कोविड मध्ये विशेष सेवा बजावल्याने 3 हजारांचे बक्षीस दिवाळीपूर्वी मिळेल अशी कर्मचारी वर्गाची अपेक्षा होती.
परंतु बोनस आणि सानुग्रह अनुदान बँकेत जमा करण्यात आले नव्हते.
महापालिका प्रशासनाने गुरुवारी रात्री अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बँक खात्यात बोनस आणि सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा केल्याने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

 

Web Title: PMC Employees News | ‘Diwali’ of PMC employees starts due to collection of bonus

 

हे देखील वाचा :

Central Government Employee | खुशखबर ! धुमधडाक्यात होणार सरकारी कर्मचार्‍यांची दिवाळी, ‘या’ दिवशी मिळतील बोनससह DA एरियरचे पैसे

Pune Crime | 50 लाखासाठी उच्चभ्रू कुटुंबात 27 वर्षीय विवाहितेचा छळ; सासू-सासऱ्यासह पतीवर FIR

Ayodhya Deepotsav 2021 | अयोध्येत पुन्हा होणार दीपोत्सवाचा विक्रम, एकाच वेळी प्रज्वलित होतील 12 लाख दिवे

 

Related Posts