IMPIMP

PMC Medical College Pune | पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात 78 प्रवेश, उर्वरित जागांसाठी विशेष फेरी

by nagesh
Pune PMC News | corona testing scam worth lakhs in pune pmc pune municipal corporation attempts by senior officials to suppress the scam

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPMC Medical College Pune | पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College Pune) वैद्यकीय पदवीच्या प्रवेशासाठी (Admission For MBBS) 78 जागांवर प्रवेश झाले आहेत. यावर्षीपासून 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून 78 जणांना प्रवेश देण्यात आला आहे. उर्वरीत जागा भरण्यासाठी सीईटी सेलकडून (CET Cell) विशेष फेरी होण्याची शक्यता आहे. इतर शहरात प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यानी त्या ठिकाणचा प्रवेश रद्द करुन पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात (PMC Medical College Pune) प्रवेश घेतला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पुणे महापालिकेचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी मोठा खटाटोप करावा लगला. अनेक कामात त्रुटी असल्याने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Commission) परवानगी नाकरली होती, त्यामुळे यंदाच्या वर्षी महाविद्यालय (Pune Municipal Medical College) सुरु होणार का याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र महापालिकेने गेल्या चार – पाच महिन्यात वर्गखोल्या, प्रयोगशाळा (Laboratory), त्यातील साहित्य, पुस्तके, वसतीगृह (Hostel) याचे काम वेगाने केल्यामुळे केंद्र शासनाने (Central Government) मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महाविद्यालयाला मान्यता दिली. पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळेपर्यंत 2021 – 22 या वर्षातील एमबीबीएसच्या प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळे या महाविद्यालाचा तिसऱ्या फेरीत समावेश करण्यात आला. (PMC Medical College Pune)

 

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आशिष बंगीनवार (College Dean Dr. Ashish Banginwar) यांनी सांगितले, MBBS प्रवेशासाठी तिसरी फेरी बुधवारी संपली. यामध्ये महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील 100 पैकी 78 जगावर शुल्क निश्चीत झाले आहे. उर्वरित जागा भरण्यासाठी सीईटी सेलकडून प्रतिक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र संधी दिली जाऊ शकते. यंदाच्या वर्षी सर्व जागा भरल्या जातील.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विद्यार्थ्यांची पुण्याला पसंती
पुण्यात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी कायमच पसंती देतात.
पुणे शहरामध्ये (Pune City) महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरु होत असून 100 जागा उपलब्ध झाल्या आहेत.
याचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतला असून विद्यार्थ्यांनी इतर शहरांपेक्षा पुणे शहराला पसंती दिली आहे.
प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत मुंबई, वाशीम, बारामती, गोंदीया, सातारा, नाशिक यासह इतर शहरात वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांनी तेथील प्रवेश रद्द करुन पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.

 

 

Web Title :- PMC Medical College Pune | 78 Students Enrolled In First MBBS Batch Of PMC’s Medical College Till Now Pune Municipal Corporation PMC News

 

हे देखील वाचा :

Modi Government | छोट्या उद्योगांसाठी मोठा दिलासा ! मोदी सरकारने नवीन योजना RAMP साठी 6062 कोटींची मंजूरी दिली, जाणून घ्या 10 मुद्द्यांमध्ये सविस्तर

Skin Cancer Symptoms | तुमचे डोळेही देतात कॅन्सरचे संकेत, अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका; जाणून घ्या

Pune Crime | ‘बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय कर’, पत्नीवर जबरदस्ती; पुढं झालं असं काही

 

Related Posts