IMPIMP

PMRDA हद्दीतील बांधकाम परवानगी अधिकाराचे विकेंद्रीकरण ! गतिमान कारभारासाठी आयुक्त राहुल महिवाल यांचा निर्णय

by nagesh
PMRDA | Decentralization of building permission authority within PMRDA limits! Commissioner Rahul Mahiwal's decision for dynamic administration

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – PMRDA | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) हद्दीतील बांधकाम परवानगीची प्रकिया
जलदगतीने व्हावी यासाठी पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल (IAS Rahul Mahiwal) यांनी बांधकाम परवानगीच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण केले
आहे. या विक्रेंदीकरणानुसार ५०० चौ.मी. क्षेत्रफळा पर्यंतच्या बांधकाम परवानगीचे अधिकार नगर रचनाकार, ५०० चौ.मी. ते १ हजार चौ.मी.पर्यंतचे
अधिकारी महानगर नियोजनकार आणि त्यापुढील बांधकामाचे अधिकार हे महानगर आयुक्तांकडे देण्यात आले आहेत. (PMRDA)

 

पीएमआरडीएचे क्षेत्रफळ सुमारे ६ हजार ९१४ चौ.कि.मी. आहे. पीएमआरडीएच्या हद्दीत २ महानगरपालिका, ७ नगरपालिका, २ नगर पंचायत, ३ कॅन्टोन्मेंट बोर्ड, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन व ८१४ गावांचा समावेश आहे.२०११ च्या जनगणनेनुसार पीएमआरडीए हद्दीतील लोकसंख्या ७३ लाख आहे. (PMRDA)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये या दोन्ही स्वराज्य संस्थांकडून बांधकाम परवानगी देण्यात येते. पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांमधील बांधकाम परवानगीचे अधिकार पीएमआरडीएकडे आहेत. तसेच कॅन्टोंन्मेंटच्या हद्दीतील बांधकाम परवानगीचे अधिकार संबधित कॅन्टोंन्मेंट बोर्डकडे आहेत.

 

महापालिकांच्या हद्दीबाहेर विस्तारणार्‍या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे होत आहेत.
यामध्ये प्रामुख्याने निवासी, व्यावसायीक, औद्योगिक व वाणिज्य वापराकरिताच्या बांधकामांचा मोठ्याप्रमाणावर समावेश आहे.
या पार्श्‍वभूमीवर पीएमआरडीएकडे नवीन बांधकाम परवानगी, सुधारित प्रस्तावांचे प्रमाण मोठे आहे.
आतापर्यंत बांधकामाच्या सर्व बांधकाम परवानगीचे अधिकार पीएमआरडीए आयुक्तांकडे होते.
परंतू आज आयुक्त राहुल महिवाल यांनी भूखंडाच्या क्षेत्रफळानुसार हे अधिकार नगर रचनाकार, महानगर नियोजनकार आणि स्वत: आयुक्त असे तीन पातळयांवर विभागून दिले आहेत.
त्यामुळे यापुढील काळात बांधकाम परवानगीची प्रकरणे विनाविलंब मंजुर होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

 

Web Title :- PMRDA | Decentralization of building permission authority within PMRDA limits! Commissioner Rahul Mahiwal’s decision for dynamic administration

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | पुढील काळात होणार्‍या लिपिक भरती प्रक्रियेत उमेदवाराची शैक्षणिक आर्हता 10 वी उत्तीर्ण ऐवजी पदवीधारक करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील

Pune Crime | प्रेमप्रकरणातून विवाहीत तरुणाची आत्महत्या, तरुणीविरोधात FIR; येरवडा परिसरातील घटना

Bombay High Court | दसरा मेळावा एसटी बूक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा शिंदे गटाला धक्का, दिले ‘हे’ निर्देश

Maharashtra Police-CID | CCTNS/ ICJS ही प्रणाली राज्यामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल पुणे सीआयडी मधील पो. नि. जीवन मोहितेंसह इतरांचा गौरव

 

Related Posts