IMPIMP

Pune PMC News | पुढील काळात होणार्‍या लिपिक भरती प्रक्रियेत उमेदवाराची शैक्षणिक आर्हता 10 वी उत्तीर्ण ऐवजी पदवीधारक करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील

by nagesh
Pune PMC News | In the upcoming clerk recruitment process, the municipal administration is trying to make the candidate's educational qualification a graduate instead of 10th pass

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune PMC News | पुणे महापालिकेच्या वतीने Pune Municipal Corporation (PMC) पुढील काळात
होणार्‍या भरती प्रक्रियेमध्ये (PMC Recruitment) लिपिक पदासाठीच्या उमेदवारांसाठी शैक्षणिक आर्हता १० वी उत्तीर्ण ऐवजी पदवीधारक करण्याचे
सूतोवाच महापालिकेतील अधिकार्‍यांनी दिले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने लिपिक पदासाठीची शैक्षणिक आर्हता यापुर्वीच १० वी ऐवजी पदवी
अशी केली असून त्याच धर्तीवर हे बदल करण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे महापालिकेतील उच्च पदस्थ अधिकार्‍याने सांगितले. (Pune PMC
News)

 

आकृतीबंध अंतिम होण्याच्या प्रक्रियेस विलंब लागल्याने पुणे महापालिकेमध्ये तब्बल एक दशकानंतर मोठ्याप्रमाणावर थेट नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये कनिष्ट अभियंता, अतिक्रमण निरीक्षक, विधी सहाय्यक आणि लिपिक पदांच्या सुमारे ४१८ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. विशेष असे की यातील निम्मी पदे हे लिपिक वर्गाची होती. लिपिक पदासाठी सुमारे ६५ हजार अर्ज आले होते. परिक्षेचा निकाल लागल्यानंतर यामध्ये सर्वोच्च गुणांनी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची आरक्षणनिहाय कागदपत्र व तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. (Pune PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लिपिक पदासाठी १० वी उत्तीर्ण, टायपिंग आणि तीन वर्षांचा अनुभव अशा प्रामुख्याने अटी होत्या.
त्यामुळे अवघ्या २०० पदांसाठी तब्बल ६५ हजार अर्ज आले होते.
अलिकडच्या काळामध्ये सर्वच शासकिय कार्यालयांमध्ये संगणकावर काम होते.
विविध विभागांमध्ये काम करत असताना कायदेशीर आणि तांत्रिक बाबींची माहिती असणे ही अत्यावश्यक बाब झाली आहे.
गतीमान प्रशासनासाठी उच्च शिक्षीत आणि अनुभवी कर्मचारी वर्गाचे योगदान मोठे ठरते.
यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने देखिल लिपिक पदासाठीची आर्हता दहावी ऐवजी पदवी अशी केली आहे.
याच धर्तीवर महापालिकेमध्ये पुढील काळात लिपिक वर्गाची पदभरती करताना उमेदवाराची शैक्षणिक आर्हता दहावी ऐवजी पदवी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

 

Web Title :- Pune PMC News | In the upcoming clerk recruitment process, the municipal administration is trying to make the candidate’s educational qualification a graduate instead of 10th pass

 

हे देखील वाचा :

Pune Crime | प्रेमप्रकरणातून विवाहीत तरुणाची आत्महत्या, तरुणीविरोधात FIR; येरवडा परिसरातील घटना

Bombay High Court | दसरा मेळावा एसटी बूक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा शिंदे गटाला धक्का, दिले ‘हे’ निर्देश

Sonalee Kulkarni | सोनालीच्या ‘व्हिक्टोरिया’ ची तारिख पुढे ढकलण्याचे हे आहे मुख्य कारण…

Maharashtra Police-CID | CCTNS/ ICJS ही प्रणाली राज्यामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल पुणे सीआयडी मधील पो. नि. जीवन मोहितेंसह इतरांचा गौरव

 

Related Posts