IMPIMP

Mumbai : पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

by bali123
police commissioner-parambir singhs transfered hemant nagarale mumbais new commissioner

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी सापडल्यानंतर या प्रकरणात मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली. वाझे यांना अटक केल्यानंतर गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. त्यातच मुंबई पोलीस आयुक्त Mumbai police commissioner बदलण्याच्या चर्चांना उधाण आले होते. काल रात्री वर्षा बंगल्यावर चार तास बैठक झाली. यानंतर आज ठाकरे सरकारने मुंबई पोलिस दलात मोठे बदल केले आहेत.

ठाकरे सरकारने आज मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली आहे. तर सध्या राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार पाहणारे हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्त पदाची सुत्रे दिली आहेत.

रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. तर संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय परमबीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

पूजा चव्हाण, मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड? ‘या’ भाजप नेत्याची टीका

DIY Hand Mask : केवळ 3 गोष्टीने दूर होईल हाताचा कोरडेपणा जाणून घ्या

सचिन वाझे प्रकरणावरून अमृता फडणवीसांनी शिवसेनेला डिवचलं, भ्रष्टाचाराचे देखील केले आरोप; म्हणाल्या…

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांना सहाव्यांदा संसद महारत्न पुरस्कार !

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट, शवविच्छेदन अहवाल NIA कडे

Related Posts