IMPIMP

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

by bali123
there was no displeasure on sharad pawar face sanjay raut statement sachin waze case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राज्याचे राजकारण चांगलेच पेटले आहे. यामुळे महाविकास आघाडी समोरील अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सचिन वाझे यांच्या प्रकरणा sachin vaze case वरून विरोधी पक्षनेते यांनी जोरदार टीका करत महाविकास आघाडीला चांगलेच अडचणीत आणले आहे. या प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्येच मतंमतांतरे होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या प्रकरणावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेवर दबाव आणत असल्याचे समोर येत आहे.

या सगळ्यामुळे राज्यातील पोलीस विभागात मोठ्या प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात सबळ पुरावे समोर येत असल्याने मुंबई पोलीस आयुक्त किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या कराव्यात अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे हे नेते शिवसेनेवर दबाव टाकत असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारची मालिन होत असलेली प्रतिमा थांबवण्यासाठी मनसुख हिरेन प्रकरणात जर कोणी दोषी आढळत असेल, त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात काय हरकत आहे, अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून घेण्यात येत आहे.सध्या राज्यातील परिस्थिती पाहता शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता संजय राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले संजय राऊत
संजय राऊत म्हणाले की, शरद पवार नाराज आहेत, हे त्यांच्या चेहऱ्यावरून अजिबात वाटलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठे बदल होतील, असे मला वाटत नाही. तसेच मी एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी पवार यांची भेट घेतली होती. पवार साहेब हे कोणत्याही प्रश्नावर चिंतन करूनच निर्णय घेतात. या अगोदरसुद्धा पवार साहेबांनी अनेक गोष्टी समजून घेतल्या आहेत. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता शरद पवारांच्या चेहऱ्यावर कोणतीही नाराजी दिसली नाही. जेव्हा त्यांना पोलीस आयुक्तांच्या बदल्या विषयी विचारलं असता ते म्हणाले की, ‘पोलीस आयुक्तांच्या बदल्याबाबत मी कसं सांगणार? सरकार चालवणारे नेते वेगळे आहेत.अशी प्रतिक्रिया दिली.

सचिन वाझेंचा शिवसेनेसोबत संबंध?, संजय राऊत म्हणाले -‘शिवसेना ही बंदी घातलेली संघटना नाही’

56 % कोरोना लसी वापराविना पडून; केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले…

Sanjay Raut : ‘वाझे प्रकरणामुळं सरकार अस्थिर झालं यात तथ्य नाही, सरकार पडणं शक्य नाही’

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ

पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर ! 17 एप्रिलला होणार मतदान, राष्ट्रवादीकडून कोणाला संधी?

Related Posts