IMPIMP

Police Inspcetor Dadasaheb Pawar | ‘डांग डिंग’ करून भरधाव कार चालविणार्‍या पोलिस निरीक्षकाकडून (PI) अपघात, नागरिकांनी पीआयला चांगलंच चोपलं?

by nagesh
Police Inspector Dadasaheb Pawar | Accident by police inspector (PI) driving speeding car by doing ‘dang ding’, citizens beat PI well?

सातारा : सरकारसत्ता ऑनलाईन – Police Inspcetor Dadasaheb Pawar | ‘डांग डिंग’ करून भरधाव कार चालविणार्‍या पोलिस निरीक्षक दादासाहेब पवार यांनी यांच्याकडून फलटण शहरातील दत्तनगर (Datta Nagar Phaltan) परिसरात अपघात झाला आहे (Satara Crime News). ही घटना शनिवारी (दि. 3) रात्री खुप उशिरा घडली आहे. संतप्त जमावाने पोलिस निरीक्षक डी.एस. पवार (PI D.S. Pawar) यांना चांगलाच चोप दिल्याची चर्चा आहे. पोलिस निरीक्षक पवार यांनी दोन बालकांना उडविल्याची चर्चा होत असल्याने पोलीसनामा ऑनलाइनने फलटण शहर पोलिस स्टेशनमध्ये (Phaltan Police Station) संपर्क साधला. त्यावेळी फोन डयुटवरील असलेल्या महिला पोलिस कर्मचारी आणि ठाणे अंमलदार यांनी सांगितले की, किरकोळ अपघात झाला आहे (Phaltan Accident News). तेथे काम करणार्‍या कामगारांना थोडसं खरचटलंय. मात्र, कार हे पोलिस निरीक्षक पवार चालवत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पीआय डी.एस. पवार यांच्या कारमध्ये दारूच्या बाटल्या (Wines Bottles) आढळल्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर (Viral On Social Media) व्हायरल झाले आहेत. (Police Inspcetor Dadasaheb Pawar)

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण शहर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक दादासाहेब पवार यांनी भरधाव कार चालविल्यामुळे अपघात झाला आहे. ही घटना फलटणच्या दत्तनगर परिसरात घडली आहे. अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी कारला थांबवले. कारमध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्याचे काही व्हिडीओ सोशल मिडीयावर देखील व्हायरल झाले आहेत. पोलिस निरीक्षक दादासाहेब पवार यांचा ‘डांग डिंग’चा कार्यक्रम झाला असावा अशी चर्चा आहे. परिसरातील संतप्त जमावाने पोलिस निरीक्षक डी.एस. पवार यांना चांगलाच चोप दिल्याची देखील चर्चा आहे. (Police Inspcetor Dadasaheb Pawar)

 

 

 

पोलिस निरीक्षकानेच वाहतूकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून कार चालविल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर काही काळ परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकार्‍याकडूनच अशा प्रकारचं कृत्य झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीसनामा ऑलनाइनने फलटण शहर पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधला असता सुरूवातीला महिला पोलिस कर्मचार्‍याने यासंदर्भात कुठलाही गुन्हा अथवा स्टेशन डायरीला नोंद नसल्याचे सांगितले.

 

त्यांच्याकडे आणखी काही प्रश्नाची विचारणा केली असता त्यांनी फोन ठाणे अंमलदारांना दिला.
ठाणे अंमलदार म्हणाले की, मीडियामध्ये चुकीचे आले आहे.
त्यावर पोलीसनामा ऑनलाइनच्या प्रतिनिधीने त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
त्यानंतर ते म्हणाले, पोलिस निरीक्षक दादासाहेब पवार यांची कार घसरली होती,
त्यामुळे तेथे काम करणार्‍या कामगारांना खरचटले आहे. कोणत्याही बालकांना उडवले नाही. (Satara Accident News)

पोलिस निरीक्षक पवार यांच्या कारमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित झाल्याबाबत फलटण शहर पोलिस स्टेशनमधील ठाणे अंमलदारांना विचारले असता त्यांनी व्हिडीओ देखील खोटे असल्याचे सांगितले. त्यावर व्हिडीओ कसे खोटे असू शकतात असे विचारले असता त्यांनी हो व्हिडीओ खोटेच आहेत असे सांगितले. मात्र, त्यांनी पोलिस निरीक्षक दादासाहेब पवार यांच्या कारचा अपघात झाल्याचे मान्य केले. दरम्यान, याबाबत पोलिस स्टेशनमध्ये कुठलाही गुन्हा अथवा स्टेशन डायरीला यासंदर्भात नोंद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकार्‍याकडून असे कृत्य झाल्यानंतर त्याबाबतचे समाज माध्यमांमध्ये झळकल्यानंतर
तरी पोलिसांनी खरे काय घडले हे सांगणे अपेक्षित आहे. मात्र, पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकार्‍याकडून
अशा प्रकारचे कृत्य घडल्याने त्यांच्या दबावापोटी पोलिस अंमलदार सत्य सांगण्यात धजावत नसतील असेच म्हणावे लागेल. (Phaltan Crime News)

Web Title : Police Inspector Dadasaheb Pawar | Accident by police inspector (PI)
driving speeding car by doing ‘dang ding’, citizens beat PI well?

Related Posts