IMPIMP

Sudhir Mungantiwar | टीका करताना सुधीर मुनगंटीवारांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख, म्हणाले- ‘तो आम्हाला…’

by nagesh
Sudhir Mungantiwar | sudhir mungantiwar attacks on sharad pawar over obc politics

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्रातील नेते मंडळींचा तोल सध्या ढासळताना दिसत आहे. अनेक नेते एकमेकांवर शेरेबाजी करताना अश्लाघ्य भाषेचा वापर करताना दिसत आहेत. तर अनेक नेते शिवराळ भाषा वापरत असल्याचे दिसत आहे. तर ज्येष्ठ नेत्यांबद्दल आदर राखला जात नाहीये. भाजप (BJP) नेते आणि संस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. मात्र टीका करत असताना मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला.

भाजपमध्ये ओबीसींचा सन्मान होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. या आरोपाला प्रत्युत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (BJP Maharashtra State President) ओबीसी आहेत. या देशाचे पंतप्रधान ओबीसी आहेत. परंतु राष्ट्रवादीमध्ये ओबीसी आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री ओबीसी आहेत का? छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) स्वत:ला ओबीसी नेते म्हणवतात. मात्र कुठे आहेत ते? त्यांना तिथे महत्त्व नाही.

खोटारड्या लोकांपासून जनतेने लांब राहावं

मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) पुढे म्हणाले, हे लोक आम्हाला शिकवतायत ओबीसी बद्दल. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जातीच्या आधारावर पत्ते खेळत नाहीत. ओबीसीचे राजकारण (OBC Politics) करत नाहीत. भाजपमध्ये ओबीसींना स्थान नाही असं म्हणणाऱ्या खोटारड्या लोकांपासून जनतेने लांब राहावं. खरंतर ओबीसी पंतप्रधान झाल्यामुळे काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीच्या पोटात दुखतंय, अशी टीका त्यांनी केली.

शरद पवारांचा एकेरी उल्लेख

काँग्रेसचा पंतप्रधान कोण आहे? तर एक ब्राह्मण आहे, जो जाणवं घालतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा 22 वर्षांपासून अध्यक्ष कोण आहे? मराठा शरद पवार, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? जनतेलाही हे समजलं पाहिजे की, मायावी चेहरे घेऊन बसलेल्या या लोकांपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे. हे लोकांसमोरील मोठा धोका आहेत.

Web Title : Sudhir Mungantiwar | sudhir mungantiwar attacks on sharad pawar over obc politics

Related Posts