IMPIMP

Police Recruitment | पोलीस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी! डिसेंबर नंतर होणार 13000 साठी भरती, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

सरकारसत्ता ऑनलाइन  – राज्याच्या पोलीस भरती प्रक्रियेत (Police Recruitment) मोठा बदल करण्यात आला आहे. सध्या सुरु असलेली भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर यापुढे होणाऱ्या प्रत्येक पोलीस भरतीची प्रक्रिया (Police Recruitment) ही शारीरिक चाचणीने (Physical test) सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उर्त्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील (rural area) तरुणांना मोठा फायदा होणार आहे.

 

राज्य गृह विभागातील (State Home Department) जवळपास पाच ते साडेपाच हजार पोलीस कर्मचारी (Police personnel) प्रत्येक वर्षी सेवानिवृत्त होत असतात.
कोरोना काळात काही पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सामाजिक शांतता व सुव्यस्था अबाधित ठेवून गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी गृह विभागात रिक्त होणारी पदे भरणे आवश्यक आहे.
राज्यात महिलांवर घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर 2020-21 या वर्षातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया (Police Recruitment) रावबली जाणार आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सध्या 2019 मधील साडेपाच हजार पदांची भरती सुरु असून या भरतीत सुरुवातीला उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे.
आता मैदानी चाचणी सुरु आहे.
दरम्यान, बऱ्याचवेळा अनेक उमेदवार मैदानी चाचणीत खूप पुढे असतात, मात्र लेखी परीक्षेत हे उमेदवार मागे पडतात.
यामध्ये खास करुन ग्रामीण भागातील उमेदवारांची संख्या मोठी असते.
त्यामुळे 2019 मध्ये पोलीस भरतीच्या नियमांत बदल (police recruitment rules Change) करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने (Cabinet Decision) घेतला होता.
त्याची अंमलबजावणी आता पुढील भरतीपासून केली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक (Additional Director General of Police) (प्रशिक्षण व खास पथके) कार्यालयाने दिली.

2020 व 2021 या दोन वर्षातील जवळपा 13 हजार पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया (Police Recruitment) एकत्रितपणे राबवण्याच्या दृष्टीने नियोजन सुरु आहे.
बिंदुनियमावली अंतिम केली जात असून शासनाकडे भरती मान्यता मिळाल्यानंतर डिसेंबर 2021 नंतर ही पदे भरली जातील.
असे अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय कुमार (ADG Sanjay Kumar) यांनी सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Police Recruitment | the first ground test will now be held for police recruitment in the state ADG Sanjay Kumar

 

हे देखील वाचा :

Sameer Wankhede Property | समीर वानखेडेंची ‘इतकी’ आहे संपत्ती ! जाणून घ्या कुठं किती एकर जमीन अन् किती फ्लॅट

High Court | अलाहाबाद HC ची महत्वाची टिप्पणी, म्हणाले – ‘डेटिंग साईटवर सक्रिय आहे म्हणून तिच्या चारित्र्याचे मूल्यांकन केले जाऊ शकत नाही’

Face Recognition System | बंद होणार फेस रेकग्निशन सिस्टम, Facebook ची घोषणा ! कोट्यावधी लोकांचा डेटा करणार डिलीट

 

Related Posts