IMPIMP

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

by pranjalishirish
Possibility of ‘lockdown’ in big cities?

मुंबई : राज्यातील नवीन कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यावर आता केवळ लॉकडाऊन Lockdown  हाच उपाय असल्याच्या निष्कर्षापर्यंत राज्य शासन आले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात नाही तर ज्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे, अशा शहरांमध्ये लॉकडाऊन करण्याची शक्यता असल्याचे सुतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, पिंपरी चिंचवड या शहरात नवीन कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. सोमवारी राज्यात २४ हजार ६४५ नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. राज्यात सध्या २ लाख १५ हजार २४१ अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबईत सोमवारी ३ हजार २६२ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. नागपूरमध्ये ३ हजार ५९६, पुणे मनपा २ हजार ३६५, पिंपरी चिंचवड १ हजार १९५, औरंगाबाद मनपा ९६६, औरंगाबाद जिल्हा ४२६, जळगाव ६८०, जळगाव मनपा ३११, नगर जिल्हा ५२१, नांदेड मनपा ७३७, नांदेड जिल्हा ३५४, बुलढाणा ४५५, नाशिक मनपा ६८५, नाशिक जिल्हा ५८६ नवीन रुग्ण सोमवारी आढळून आले आहेत.

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, अन्यथा लॉकडाऊन Lockdown करावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी जनतेशी संवाद साधताना सांगितले होते. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर कठोर निर्णय घ्यावे लागतील. लॉकडाऊन करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यानंतरच याबाबतचा निर्णय घेऊ, असे राजेश टोपे यांनी सूचित केले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊन  Lockdown जाहीर होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

Also Read :

67th National Awards : ‘छिछोरे’ बेस्ट हिंदी फिल्म, तर ‘मणिकर्णिका’ साठी कंगनाला बेस्ट अ‍ॅक्ट्रेस अवॉर्ड, पहा संपूर्ण लिस्ट

परमबीर सिंगांचा आणखी एक दावा; आता घेतलं रश्मी शुक्लांचं नाव अन् म्हणाले…

Nana Patole : ‘शेतकरी संघटनांच्या 26 मार्चच्या भारत बंदला काँग्रेसचा सक्रिय पाठींबा’

HM अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे ’पावर बँक’ बनण्यामागे काय आहे ‘पॉलिटिक्स’?

‘क्लीनचिट द्यायला शरद पवार न्यायाधीश नाहीत’; पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा टोला

महाविकास आघाडीसोबत 190 आमदार असल्याचा दावा; हसन मुश्रीफ यांनी दिले भाजपला ‘आव्हान’

…म्हणून फडणवीसांच्या निवासस्थानी सुरक्षाव्यवस्थेत वाढ

‘गोकुळ’चे राजकारण ! मंत्री सतेज पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना दणका

Related Posts