IMPIMP

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत दररोज 334 रुपयांची गुंतवणूक ! काही वर्षात मिळू शकते 15 लाखापेक्षा जास्त रक्कम, समजून घ्या – गणित

by nagesh
Best Govt Saving Schemes | best govt saving schemes for child to senior citizens from ssy to ppf know all details here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे चांगले मानले जाते. या सरकारी स्कीम असल्याने जोखीम सुद्धा नाहीच्या बरोबर असते. या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणुकीवर बँकांच्या तुलनेत जास्त रिटर्न दिला जातो. (Post Office Scheme)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही

यापैकी एक योजना पोस्ट ऑफिसची RD आहे, ज्यामध्ये तुम्ही दरमहिना काही ठराविक रक्कम गुंतवू शकता. यामध्ये 100 रुपयांनी सुद्धा खाते उघडू शकता. मात्र गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही. या योजनेत व्याजदर सुद्धा चांगला दिला जातो.

 

कशी सुरू करावी गुंतवणूक

पोस्टाच्या RD जमा योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला आरडी शिवाय काही महत्वाच्या कागदपत्रांसोबत खाते उघडावे लागेल. ही किरकोळ रक्कम जमा करणे आणि उच्च व्याजदर मिळवण्याची परवानगी देते. ही योजना पाच वर्षांसाठी असते. तर बँकांमध्ये जर तुम्ही आरडी खाते उघडले तर ते सहा महिने, एक वर्ष, दोन वर्ष आणि तीन वर्षासाठी उघडता येते. (Post Office Scheme)

 

5.8% योजनेचा व्याजदर

प्रत्येक तिमाहीत, यामध्ये जमा करण्यात आलेल्या रक्कमेवर व्याजाची गणना (वार्षिक दरावर) केली जाते, आणि तिमाहीच्या अखेरीस ते तुमच्या खात्यात (चक्रवाढ व्याजासह) जमा केले जाते. पोस्ट ऑफिसद्वारे या योजनेत तुम्हाला 5.8% व्याजदर दिला जातो, जो 1 एप्रिल 2020 पासून लागू केला गेला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दररोज 334 रुपयांच्या बचतीवर किती मिळतील?

जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनेत दररोज जवळपास 334 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला महिन्याचे 10,000 रुपये जमा करावे लागतील. ज्यावर तुम्हाला 5.8 टक्केच्या दराने व्याज दिले जाते. ही गुंतवणूक तुम्हाला 10 वर्षासाठी करावी लागेल. जेव्हा मॅच्युरिटी पूर्ण होईल तेव्हा तुमच्या खात्यात 16,28,963 रुपये मिळतील.

 

RD स्कीमची वैशिष्ट्ये

तुमच्या खात्यात नियमित प्रकारे पैसे जमा करत राहिले पाहिजे.
एखादा महिना पैसे भरण्यास खंड पडल्यास एक टक्का मासिक दंड
वसूल केला जातो आणि चार हप्ते बुडाल्यानंतर तुमचे खाते बंद करण्यात येईल.

 

व्याजावर कर आकारणी

याशिवाय यामध्ये कर सुद्धा घेतला जातो, जर जमा रक्कम 40,000 रुपयांपेक्षा जास्त असेल
तर 10 टक्के वार्षिक कर लागू होतो. आरडीवर मिळणारे व्याज टॅक्सेबल असते,
परंतु पूर्ण मॅच्युरिटी रक्कमेवर नाही. अशाप्रकारे FD प्रमाणे, ज्या गुंतवणुकदारांचे कोणतेही करपात्र उत्पन्न नाही,
ते फॉर्म 15G भरून TDS सूटचा दावा करू शकतात. (Post Office Scheme)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Post Office Scheme | 334 rupees invested every day in this scheme of post office in a few years you get more than 15 lakhs

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना मार्केटयार्ड पोलिसांकडून अटक

अवघ्या 65 हजार रुपयात 122 km ची रेंज देते Hero Electric ची ही इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या सविस्तर

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांनी आपल्या कन्येचे केले रजिस्टर लग्न; भावुकहून म्हणाले…

 

Related Posts