IMPIMP

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांनी आपल्या कन्येचे केले रजिस्टर लग्न; भावुकहून म्हणाले…

by nagesh
Jitendra Awahad | registered marriage of daughter of ncp leader and minister jitendra awhad at thane

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Jitendra Awhad | राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या कन्येचा विवाह (Marriage) अगदी साधेपणाने केला आहे. मंत्र्यांच्या मुलींचा विवाह अगदी साध्या पद्धतीने झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आव्हाड यांच्या कन्येचा विवाहसोहळा आज (मंगळवारी) पार पडला. त्यांनी आपल्या कन्येचा विवाह रजिस्टर पद्धतीने केला आहे. त्यावेळी मोजकेच पाहुणे उपस्थित होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

अनेक नेते, मंत्र्यांच्या मुलांची लग्न म्हटलं की बँडबाजा, वरात, मोठा गाजावाजा असतो. अनेक नेते, मंत्री, अधिकारी पाहुणे यांची उपस्थित असते. तसेच,
महागड्या लग्न पत्रिका, फाईव्ह स्टार हॉटेल असतात. दरम्यान, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शाही लग्न पद्धतीला फाटा देऊन आपल्या
मुलीचे अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं आहे. याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

 

 

जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक मुलगी नताशाचा (Natasha) विवाह व्यावसायिक एलन पटेल (Alan Patel) याच्याशी रजिस्टर पद्धतीने पार पडला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यानिमित्ताने इतर लोकप्रतिनिधींसमोर आदर्श ठेवला आहे. दरम्यान, एका बापाने अशावेळी काय बोलायचं? असं सांगताना आव्हाड भावुक झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. ‘कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी ते होत नाही, कारण घरात दिसणारी, बागडणारी, कधीतरी अंगावर धावून येणारी, ओरडणारी आता घरात नसणार आहे, घरातील घरपण गेल्यासारखं असेल,’ अशा भावना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

Web Title :- Jitendra Awahad | registered marriage of daughter of ncp leader and minister jitendra awhad at thane

 

हे देखील वाचा :

Miss Universe 2021 | उर्वशी रौतेलाला आमंत्रण, आता जज करेल मिस यूनिवर्स कॉन्टेस्ट

Ankita Harshvardhan Patil | हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता होणार ठाकरे घराण्याची सून ! राज ठाकरेंना ‘शिवतीर्था’वर जाऊन दिले लग्नाचे आमंत्रण

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 74 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts