IMPIMP

EPFO | आयुष्यभर दरमहा मिळेल पेन्शन ! कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेत असा करा ऑनलाइन अर्ज

by nagesh
EPFO | good news pensioners epfo launches face recognition facility will help senior citizens

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPFO | कर्मचारी पेन्शन योजना (EPS) 16 नोव्हेंबर 1995 ला सुरू करण्यात आली होती. या योजनेत कारखाने आणि इतर प्रतिष्ठानांच्या सर्व कर्मचार्‍यांना सहभागी करण्यात आले आहे. कर्मचारी भविष्य निधी योजनेंतर्गत (EPFO) कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या 8.33 टक्के योगदानाचा एक भाग कंपनीकडून कर्मचारी पेन्शन निधीत 15 दिवसांच्या आत पाठवला जातो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मोदी सरकार (Modi Government) सुद्धा कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत सदस्यांच्या वेतनाच्या 1.16 टक्केच्या दराने अंशदान करते, जे थेट कर्मचार्‍यांच्या कोषात (EPFO) जमा केले जाते. जर सदस्याचे वेतन 15,000 रुपये प्रति महिन्यापेक्षा जास्त असेल, तर कंपनी आणि केंद्र सरकारद्वारे देय योगदान केवळ त्याच्या 15,000 रुपयाच्या वेतनावर देय रक्कमेपर्यंत मर्यादित असेल.

 

पात्रता मापदंड

 

  • ईपीएस (EPS) 95 पेन्शन योजनेंतर्ग पेन्शन लाभ मिळवण्यासाठी कर्मचार्‍यांना किमान 10 वर्षाची सेवा करावी लागते.
  • सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष आहे.
  • सदस्य 50 वर्षाच्या वयापासून कमी दरावर आपला ईपीएस सुद्धा काढू शकतात.
  • जर एखाद्या कर्मचार्‍याने 10 वर्षापेक्षा कमी सेवा पूर्ण केली आहे. परंतु 6 महिन्यापेक्षा जास्त सेवेनंतर, तो दोन महिन्यापेक्षा जास्त काळापर्यंत बेरोजगार राहिल्यास ईपीएस रक्कम काढू शकतो.
  • जर कुणी कर्मचारी पूर्णपणे सेवा करण्यास असमर्थ असेल तर त्यास मासिक पेन्शनचा अधिकार आहे.
  • सेवेदरम्यान सदस्याच्या मृत्यूच्या बाबतीत सदस्याचे कुटुंबसुद्धा पेन्शनसाठी पात्र होते.

 

या योजनेंतर्गत लाभ

 

  • ईपीएस 95 अंतर्गत कुटुंब नसल्यास सदस्याच्या मृत्यूनंतर नॉमिनीला पेन्शन दिली जाईल.
  • एखाद्याच्या मृत्यूनंतर अवलंबित आई-वडीलांना देण्यात येणारी मासिक विधवा पेन्शनच्या बरोबरीने आजीव पेन्शन दिली जाते. परंतु सदस्याचे कुटुंब किंवा नॉमिनी नसावा.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

ईपीएस डिजिटल नामांकनासाठी असा करा अर्ज

 

  • EPFO च्या वेबसाइटवर जा ‘कर्मचार्‍यांसाठी सेवा’ पर्याय निवडा.
  • सदस्य यूएएन/ऑनलाइन सेवा (ओसीएस/ओटीसीपी) वर क्लिक करा.
  • आता यूएएन आणि पासवर्डसह लॉगिन करा.
  • ‘मॅनेज टॅब’ अंतर्गत ई-नामांकन निवडा.
  • माहिती नोंदवा, आता सेव करून क्लिक करा.
  • कौटुंबिक घोषणा अपडेट करण्यासाठी होय वर क्लिक करा.
  • कौटुंबिक माहिती द्या वर क्लिक रा. (एकापेक्षा जास्त नामांकित व्यक्ती नोंदवता येऊ शकतात.)
  • शेयर केलेली एकुण रक्कम घोषित करण्यासाठी ‘नामांकन माहिती’वर क्लिक करा. नंतर ‘सेव ईपीएफ नॉमिनेशन’ वर क्लिक करा.
  • पुढील टप्प्यात ओटीपी जनरेट करण्यासाठी ‘ई-साइन’ चेक करा. आधारसंबंधी मोबाइल नंबरवर ‘ओटीपी’ पाठवले जातील. या टप्प्यानंतर तुमचा अर्ज पूर्ण होईल.

 

Web Title : EPFO | epfo pension scheme pension will be available every month for life apply online in the pension scheme of employees provident fund

 

हे देखील वाचा :

Online gambling | काय सांगता ! होय, चक्क बँक मॅनेजरनेच जुगारात उडवले ग्राहकांचे कोट्यावधी रुपये

Pune News | विहीरीत पडलेल्या 42 वर्षाच्या महिलेचे अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले प्राण, पुण्याच्या सोमवार पेठेतील घटना

Hindustani Bhau | नवाब मलिकांविरोधात ‘हिंदुस्तानी भाऊ’चा एल्गार; म्हणाले – ‘कधीही आवाज द्या, मी साथ देईन, कारण…’

 

Related Posts