IMPIMP

Prakash Ambedkar | शरद पवार यांच्यावरील ‘त्या’ वक्तव्याबाबत प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्टीकरण; म्हणाले…

by nagesh
Prakash Ambedkar | prakash ambedkar big claim over

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना शरद पवार (Sharad Pawar) हे आजही भाजपचेच आहेत. असे वक्तव्य केले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला जात आहे. दरम्यान, यावर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आज (दि.२७) माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘इतिहासातील काही घटनांवरून मी ते विधान केलं होतं. त्याचा आत्ताच्या परिस्थितीशी काही एक संबंध नाही. कुणी त्याला चुकीच्या पध्दतीने घेत असेल तर याला आपण काहीही करू शकत नाही.’ असं यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

 

तर यावर पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले की,
‘भाजपाला (BJP) तुम्ही कमी लेखू नका. भाजपा कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही स्थराला जाऊ शकते.
भांडण लावणे, मतभेद निर्माण करणे हा त्यांचा फंडा आहे. जेव्हा आपण निवडणुक जिंकत नाही, असं भाजपाला वाटतं तेव्हा ते भांडणं लावण्याचे काम करतात.’ अशी टीका यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर केली.

 

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) महाविकास आघाडी प्रवेशावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
यांनी भाष्य केले. एका कार्यक्रमाला आले असता, पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर
हे महाविकास (MVA) आघाडीमध्ये नाहीत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती केली आहे.
त्यांचा आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही.
असं यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Prakash Ambedkar | prakash ambedkar clarification on statement regarding sharad pawar with bjp

 

हे देखील वाचा :

Australian Open 2023 | ग्रँडस्लॅमसह निवृत्ती घेण्याचे सानिया मिर्झाचं स्वप्न भंगलं; मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात स्वीकारावा लागला पराभव

Pune Crime News | चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकण्याची आणि मुलाला किडनॅप करण्याची धमकी देऊन मित्राच्या पत्नीवर बलात्कार, बहिण-भावावर FIR

Maharashtra Politics | राज्यात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘मविआ’ला मिळू शकते घवघवीत यश; एका सर्वेच्या अहवालात ‘ही’ बाब उघड

 

Related Posts