IMPIMP

Prashant Damle | ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाला फालतू आणि दर्जाहीन म्हणणाऱ्याला प्रशांत दामलेनी सुनावले खडेबोल

by nagesh
Prashant Damle | prashant damle gave reply to user who trolled his marathi play eka lagnachi pudhchi gosht

सरकारसत्ता ऑनलाईन  – नुकताच अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता. सध्या प्रशांत दामले त्यांच्या नाटकासाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमधला १२ हजार ५००वा नाट्यप्रयोग सादर केला होता. प्रशांत दामले (Prashant Damle) हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नुकताच प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाला एका नेटकऱ्यानी दर्जाहीन म्हटले होते. यावर प्रशांत दामले यांनी त्यांच्या शैलीत त्या नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

 

नुकताच प्रशांत दामले यांनी एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाच्या प्रयोगासाठी संभाजीनगर येथे गेले होते. यादरम्यान रस्त्याची अवस्था दर्शवणारा एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला होता. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता आणि त्याला अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या. याच व्हिडिओ वर एका नेटकऱ्यांनी कमेंट करत लिहिले होते की, “मुळात हे पुढची गोष्ट नाटकच अतिशय फालतू आणि दर्जाहीन आहे. त्या गोष्टीत काहीही जीव नाही”. या नेटकऱ्याच्या कमेंटला प्रशांत दामले यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर देत म्हटले की, “बरं…. त्याच नाटकाचे 547 प्रयोग झाले आहेत,प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो की”. सध्या प्रशांत दामलेची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दुसरीकडे प्रशांत दामले (Prashant Damle) यांची ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ आणि ‘सारखं काहीतरी होतंय’
हे दोन नाटक रंगभूमीवर धुमाकूळ घालत आहेत. तर या नाटकांना प्रेक्षकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद ही मिळत आहे.

 

Web Title :- Prashant Damle | prashant damle gave reply to user who trolled his marathi play eka lagnachi pudhchi gosht

 

हे देखील वाचा :

MVA Mahamorcha | शरद पवारांचा इशारा, म्हणाले-‘राज्यपालांची हकालपट्टी करा, अन्यथा…’ (व्हिडिओ)

Malaika Arora | वय वाढत असल्याने मला ‘या’ गोष्टींची भीती वाटत आहे – मलायका अरोरा

Devendra Fadnavis | सावरकरांचा अपमान काँग्रेसने केला, तेव्हा शिवसेना कुठे होती; देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

 

Related Posts