IMPIMP

Malaika Arora | वय वाढत असल्याने मला ‘या’ गोष्टींची भीती वाटत आहे – मलायका अरोरा

by nagesh
Malaika Arora | As I get older, I fear 'these' things - Malaika Arora

सरकारसत्ता ऑनलाईन  – अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या चर्चेत आहे. ती अभिनेता अर्जुन कपूर सोबत डेट करत
असल्यापासूनच चर्चेत होती. मात्र पुन्हा एकदा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे सध्या सुरू असलेला तिचा नवा कार्यक्रम ‘मूव्हिंग इन विथ मलायका’. या
कार्यक्रमात तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहे. आता मलायका (Malaika Arora) 49 वर्षाची होत असताना काही गोष्टींची भीती

असल्याचे तिने या कर्यक्रमात सांगितले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या कार्यक्रमात आजपर्यंत फराह खान, करण जोहर, कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही यांनी हजेरी लावली होती. यावेळी भारतीने मलायकाच्या वय, कपडे आणि बॉडीवरून कमेंट करणाऱ्यांना चांगले खडेबोल सुनावले होते. त्यानंतर नोरा फतेही सोबत चर्चा सुरू असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

 

याच व्हिडिओमध्ये मलायका नोरा फतेहीशी बोलताना तिला कोणत्या गोष्टींची भीती वाटते याबद्दल खुलासा केला आहे. यावर बोलताना मलायका म्हणाली, “माझे वय वाढत चालले आहे जसं वय वाढत चालले आहे तसे मला अनेक गोष्टींची भीती वाटत आहे. शेवटी मी पण एक माणूसच आहे. कधी कधी माझ्याकडे काहीच काम नसतं मी घरी बसून असते, तेव्हा मला असं वाटतं अरे मी हे काम करू शकले असते आणि काही अशा गोष्टी होतात ज्यामुळे मी उद्ध्वस्तही होऊ शकते. आयुष्यात आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या असुरक्षिततेच्या भावनांशी लढावं लागतं”. ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शोमध्ये मलायकाने याआधी फराह खान बरोबर देखील तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान ते आत्तापर्यंत अर्जुन कपूर बरोबरच्या तिच्या नात्यावर भाष्य केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Malaika Arora | As I get older, I fear ‘these’ things – Malaika Arora

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | सावरकरांचा अपमान काँग्रेसने केला, तेव्हा शिवसेना कुठे होती; देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

Pune District Mining Crusher Industries Association | पुणे जिल्हा खाण क्रशर उद्योग संघाच्या वतीने बेमुदत संप

Curry Leaves Benefits | रोजच्या आहारात कढीपत्त्याचा करा समावेश, डायबिटीज-कोलेस्ट्रॉलसह या आजारांचे काम होईल तमाम

 

 

Related Posts