IMPIMP

Devendra Fadnavis | सावरकरांचा अपमान काँग्रेसने केला, तेव्हा शिवसेना कुठे होती; देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

by nagesh
Devendra Fadnavis | deputy cm devendra fadnavis announced to investigate case of bogus recruitment in the ministry

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – मुंबईत आज महाविकास आघाडीकडून महामोर्चा (MVA Mahamorcha) काढण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या सभेत महाविकास आघाडीमधील नेत्यांनी राज्यपाल (Governor Bhagat Singh Koshyari) , भाजप (BJP) आणि शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्लाबोल केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीला जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच रोज सावरकरांचा अपमान काँग्रेसने (Congress) केला, तेव्हा शिवसेना कुठे होती. राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतोय, अशी टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, आजचा मोर्चा हा राजकीय मोर्चा आहे. जे सतांना शिव्या देतात, ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जन्म कुठे झाला हे माहित नाही, ते आज मोर्चा काढतात. रोज सावरकरांचा (Swatantra Veer Savarkar) अपमान काँग्रेसने केला, तेव्हा शिवसेना (Shivsena) कुठे होती. राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतोय, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका करताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांची कॅसेट तशीच होती जी बदलली नाही. त्यांच्या भाषणात एकही नवीन मुद्दा नव्हता, असा टोला फडणवीसांनी लगावला.

 

ज्यांना स्वत:चं सरकार टिकवता आलं नाही, त्यांच्या नाकाच्या खालून आम्ही हे सरकार घेऊन गेलो.
त्यामुळे हे सरकार टिकेल आणि पुन्हा सत्तेत येऊ. तीन जण येऊन पण गर्दी जमवू शकले नाहीत.
उद्धव ठाकरे यांचा पक्ष जसा नॅनो होतोय तसा आजचा मोर्चा नॅनो होता, अशी टीका फडणवीस यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | bjp dcm devendra fadnavis on maha vikas aghadi maha morcha in mumbai

 

हे देखील वाचा :

Pune District Mining Crusher Industries Association | पुणे जिल्हा खाण क्रशर उद्योग संघाच्या वतीने बेमुदत संप

Curry Leaves Benefits | रोजच्या आहारात कढीपत्त्याचा करा समावेश, डायबिटीज-कोलेस्ट्रॉलसह या आजारांचे काम होईल तमाम

Pune Crime | किरकोळ कारणावरुन तरुणावर कोयत्याने वार, हडपसर परिसरातील घटना

Weight Loss | झोपण्यापूर्वी प्या हे ३ ड्रिंक्स, ‘जिम’ला न जाता होईल कॅटरिनासारखी फिगर

 

Related Posts