IMPIMP

Privatization | विकली गेली ‘ही’ मोठी सरकारी कंपनी, आता रतन टाटा यांच्या हातात सूत्रे

by nagesh
Privatization | privatization news government company ninl owned by tata responsibility will be handed over from july

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Privatization | खाजगीकरणाला विरोध होत असतानाही सरकारने आणखी एक मोठी कंपनी खाजगी हातात सोपवली आहे. दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी सरकारी कंपनी विकत घेतली आहे. वास्तविक ही कंपनी तोट्यात चालली होती आणि हा प्लांट 30 मार्च 2020 पासून बंद आहे. (Privatization)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रतन टाटा यांच्या हातात सूत्रे

ओडिशा स्थित नीलाचल इस्पात निगम लिमिटेड (NINL) ला टाटा समूहाच्या एका फर्मकडे सोपवले जात आहे, त्याची संपूर्ण प्रक्रिया जुलैच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

 

टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स (TSLP), टाटा स्टीलच्या युनिटने या वर्षी जानेवारीमध्ये NINL मधील 12,100 कोटी रुपयांच्या एंटरप्राईझ मूल्याने 93.71 टक्के भागीदारी विकत घेण्याची बोली जिंकली होती, असे एका अधिकार्‍याने सांगितले. (Privatization)

 

जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड, नलवा स्टील अँड पॉवर लिमिटेड आणि जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड यांच्या आघाडीला मागे टाकून कंपनीने हे यश मिळवले. आता लवकरच रतन टाटांची फर्म हा प्रकल्प सांभाळणार आहे.

 

अंतिम टप्प्यात प्रक्रिया
एका अधिकार्‍याने पीटीआय-भाषा या वृत्तसंस्थेला सांगितले की, व्यवहार अंतिम टप्प्यात आहे आणि पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत हस्तांतरण होईल. कंपनीमध्ये सरकारची कोणतीही भागीदारी नसल्यामुळे, विक्रीची रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली जात नाही. ती ओडिशा सरकारच्या चार CPSE आणि दोन PSU कडे जाईल.

कर्जबाजारी कंपनी
नीलाचल इस्पात निगम लिमिटेडचा कलिंगनगर, ओडिशा येथे 1.1 मेट्रिक टन क्षमतेचा एकात्मिक स्टील प्लांट आहे.
ही सरकारी कंपनीही मोठ्या तोट्यात चालली असून 30 मार्च 2020 पासून हा प्लांट बंद आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

31 मार्च 2021 पर्यंत कंपनीवर 6,600 कोटी रुपयांची कर्जे आणि दायित्वे आहेत,
ज्यात प्रवर्तकांचे 4,116 कोटी रुपये, बँकांचे 1,741 कोटी रुपये, इतर कर्जदार आणि कर्मचार्‍यांची मोठी देणी यांचा समावेश आहे.

 

Web Title :- Privatization | privatization news government company ninl owned by tata responsibility will be handed over from july

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | ‘… तर आमदार बरखास्तीची कारवाई सुरु होऊ शकते’ – प्रकाश आंबेडकर

Maharashtra Political Crisis | प्रथमच शिंदेगटाची मोठी मागणी ! CM उद्धव ठाकरेंनी सन्मानपूर्वक राजीनामा द्यावा

Multibagger Penny Stock Return | रू. 13 चा हा शेअर 212 रुपयांचा झाला, लागोपाठ 30 दिवसांपासून रॉकेट स्पीड, जोरदार रिटर्न

 

Related Posts