IMPIMP

Maharashtra Political Crisis | ‘… तर आमदार बरखास्तीची कारवाई सुरु होऊ शकते’ – प्रकाश आंबेडकर

by nagesh
Prakash Ambedkar | prakash ambedkar big claim over

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Political Crisis | राज्याच्या सत्तानाट्यामध्ये 16 बंडखोर आमदारांना (Rebel MLA) सुप्रीम
कोर्टाने (Supreme Court) दिलासा दिला आहे. ज्यांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Assembly Vice President Narhari Zirwal) यांनी
नोटीस पाठवली होती. यानुसार आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत उत्तर देणं बंधनकारक होते. मात्र, न्यायालयाने या नोटीसीला उत्तर देण्यासाठी 11
तारखेपर्यंतची वेळ दिली आहे. एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde Group) दिलासा (Maharashtra Political Crisis) मिळाला आहे. आता
एकनाथ शिंदे गट राज्यपालांना (Governor) पत्र लिहून आपण पाठिंबा काढून घेतल्याची घोषणा करु शकतात का ? असा प्रश्न उपस्थित केला जात
आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये आपण महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi Government) पाठिंबा काढून घेतल्याचे सांगितले. मात्र त्यांनी राजभवनाला अद्याप तसं पत्र दिलेले नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Vanchit Bahujan Aaghadi Chief Prakash Ambedkar) यांच्या मते एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी (Floor Test) जाणार नाहीत. यासाठी त्यांनी तसे कारणही दिले आहे. सभागृहाच्या प्रोसिडिंग सुरु झाल्या तर आमदार बरखास्तीची कारवाई सुरु होऊ शकते, अशी भीती त्यांना वाटत असावी. कारण तसे अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहेत, ज्यात न्यायालय मध्ये येऊ शकत नाहीत, असं आंबेडकर म्हणाले. (Maharashtra Political Crisis)

 

प्रकाश आंबेडकर म्हणाले, बैठकीत उपस्थित न राहणे हा शिवसेनेच्या घटनेमध्ये गुन्हा असेल तर उपाध्यक्ष तशी कारवाई करु शकतात. कोर्टात हा निकाल अत्यंत विचाराने दिलेला आहे, कारण सध्या राज्यातील राजकीय वातावरण शांत करण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

 

सभागृहाच्या अध्यक्षांच्या कार्यकक्षेमध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकतं का नाही,
याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जास्त स्पष्ट करावं, या प्रकरणाचं घोंगडं जास्त काळ भिजत ठेवता येणार नाही.
न्यायालयाने एण्ड लॉ पॉईंटवर स्पष्ट निकाल द्यावा. त्यामुळे एकमेकांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप होणार नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
तसेच जोपर्यंत भाजप (BJP) चेस बोर्डावर येणार नाही, तोपर्यंत नवीन सरकार किंवा मध्यावधी निवडणूक, यासंदर्भात स्पष्टता येणार नाही.
याशिवाय यंदाच्या आषाढी एकादशीची विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हेच करतील असेही आंबेडकर यांनी म्हटले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | BVA Chief prakash ambedkar feels eknath shinde will not go for floor test maharashtra political crisis

Related Posts