IMPIMP

Pune Band News | शहरात शुकशुकाट; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

by nagesh
Pune Band News | pune has been shut down to protest governor bhagat singh koshyari insulting remarks pune band news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – पुण्यात विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येत पुणे बंदची (Pune Band News) हाक दिली आहे. त्यानुसार आज मंगळवारी (दि. 13 डिसेंबर) पुणे शहर बंद ठेवण्यात आले आहे. या बंदला नागरिकांनी आणि दुकानदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यात सर्व दुकाने आणि आस्थापना बंद आहेत. पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. तसेच जागोजागी पोलीस देखील तैनात आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधाने केल्याच्या निषेधार्थ पुण्यात बंद पाळला (Pune Band News) जात आहे.

 

या मूक मोर्चात शहरातील आणि इतर भागातील हजारो शिवप्रेमींनी सहभागी झाले आहेत.
छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा सुरू होणार झाला. अलका चित्रपटगृह
(लो. टिळक चौक), लक्ष्मी रस्ता, बेलगाव चौक मार्गे लाल महाल येथे जाहीर सभेने या मोर्चाचा समारोप होणार आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.
संभाजी ब्रिगेड व अन्य सामाजिक, स्वयंसेवी संस्था, संघटना, व्यापारी महासंघ, गणेशोत्सव मंडळे यांनी देखील
पुणे बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

छत्रपती उदयनराजे भोसले मोर्चात सहभागी झाले आहेत. शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांचा पाठिंबा देखील
या बंदला आहे. भाजपचे लोक आणि नेते सातत्याने शिवाजी महाराज आणि राज्यातील महापुरुषांचा अपमान
करत आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात निषेध नोंदविण्यासाठी हा बंद पुकारल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले.

 

Web Title :- Pune Band News | pune has been shut down to protest governor bhagat singh koshyari insulting remarks pune band news

 

हे देखील वाचा :

Year Ender 2022 | वर्ष 2022 मध्ये ‘हे’ 7 सुपरफूड्स होते ट्रेंडमध्ये, जाणून घ्या त्यांचे जबरदस्त फायदे

Pune Crime | कोंढव्यातील खंडणीखोर आसिफ खान टोळीवर ‘मोक्का’; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 114 वी कारवाई

Nagpur Central Jail | कारागृहातच कैद्याचा मृत्यू; तुरुंग रक्षकाने मारहाण केल्याचा कैद्यांचा आरोप

 

 

Related Posts