IMPIMP

Pune Bangalore National Highway | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद, अनेक वाहने अडकली (Video)

by nagesh
Pune Bangalore national highway closed for transport

कोल्हापूर न्यूज (Kolhapur News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)  Pune Bangalore National Highway | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune Bangalore National Highway) सांगली फाटा येथे पुराचे पाणी आल्याने या महामार्गावरील वाहतूक बंद (Traffic closed) करण्यात आली आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune Bangalore National Highway) दोन्ही बाजूची वाहतूक बंद केल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. अनेक वाहने अडकून पडली आहेत. पोलिसांनी (Police) नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही पुराचे पाणी पाहण्यासाठी येऊन नये. तसेच कोरोना महामारीचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करुन कोरोना नियमांचे उल्लंघन करु नये.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy rain) पडत आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली मधील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शुक्रवारी (दि.23) सायंकाळी पुराचे पाणी महामार्गावर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. सध्या महार्गावर 5-6 फूट पाणी असून पाणी अत्यंत वेगाने वाहत आहे. ऑगस्ट 2019 नंतर महामार्गावर पाणी आले आहे. महामार्गावर पाणी आल्याने पोलिसांनी बॅरिकेट्स लावून वाहतूक बंद केली. शिरोली पोलीस (Shiroli Police) प्रशासनाने महामार्गावरील वाहतूक बंद केल्याने कोल्हापूरचा संपर्क तुटला आहे.

 

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. महामार्गावर पाणी आल्याने पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर येथून येणारी वाहने कोगनोळी चेकपोस्टवरून व हुबळी, धारवाड निपाणी कडून परत पाठवण्यात येत आहेत. वाहनधारकांनी या मार्गे न जाता इतर मार्गाने जावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरम्यान आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी महामार्गावर चार फुट पाणी आहे. पंचगंगेची पाणीपातळी ओसलत असली तरी पुणे-बंगळूर महामार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद आहे.

Web Title :– Pune Bangalore national highway closed for transport

हे देखील वाचा:
Crime in Nagpur | पोलिसांच्या दाव्याची संशयिताने केली पोलखोल; म्हणाला – ‘चार महिन्यापासून बंद आहेत सीसीटीव्ही’

Pimpri-Chinchwad Police | खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक, आरोपींकडून पिस्टल जप्त

Pegasus Effect | महाराष्ट्र सरकारचे फरमान, आवश्यक असेल तरच वापरा मोबाइल, अन्यथा लँडलाईनचा करा वापर

KYC Update | केवायसी अपडेट पडले महागात; पोलिसांनी दोन तासात परत केले 1 लाख 60 हजार रुपये

Related Posts