IMPIMP

Pune Corona | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 399 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | In the last 24 hours, the number of new patients in Pune is more than the number of patients recovering from corona, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुण्यात कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच दररोज कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचे (Omycron Covid Variant) रुग्ण आढळून येत असल्याने चिंता अधिक वाढली आहे. आज सर्वत्र नववर्षाचे स्वागत केले जात असल्याचं पहावयास मिळाले. दिवसभरात पुण्यात तब्बल 399 नवीन कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 127 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही वाढत आहे. तसेच ओमिक्रॉन व्हेरियंटने देखील चिंता वाढवली आहे. पुण्यात आजपर्यंत 4 लाख 99
हजार 430 रुग्णांनी कोरोनावर (Pune Corona) मात केली आहे. पुण्यातील एकुण बाधितांची संख्या आता 5 लाख 10 हजार 617 वर जाऊन पोहचली
आहे. आज पुण्यातील एकाचा आणि शहराबाहेरील एका रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत शहरात 9 हजार 117 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 2070 अॅक्टिव्ह रुग्ण
आहेत. यामध्ये 92 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7588 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. अशी माहिती पुणे
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (PMC Health Department)

 

 

Web Title : Pune Corona | 399 new corona patients in Pune in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Cyber Crime | सावधान ! ओमिक्रॉनच्या नावाखाली होतेय फसवणूक, गृह मंत्रालयाकडून गाईडलाईन जारी

PPF Investment | नवीन वर्षात सुरू करा बचत आणि सुरक्षित गुंतवणूक, दरमहिना 1000 रु. जमा करून बनवा 12 लाखाचा फंड, जाणून घ्या पूर्ण योजना

Life Certificate | पेंशनर्सला मोठा दिलासा ! आता तुम्ही ‘या’ तारखेपर्यंत जमा करू शकता हयातीचा दाखला, जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts