IMPIMP

PPF Investment | नवीन वर्षात सुरू करा बचत आणि सुरक्षित गुंतवणूक, दरमहिना 1000 रु. जमा करून बनवा 12 लाखाचा फंड, जाणून घ्या पूर्ण योजना

by nagesh
Changes In PPF | changes in ppf account rules major changes in public provident fund know before investment

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PPF Investment | देशातील सुरू असलेल्या आर्थिक अस्थिरतेच्या या काळात केलेली बचत अडचणीच्या काळात उपयोगी पडते. जास्त रिटर्नचा दावा करणार्‍या अनेक योजना आहेत. परंतु सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीने पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (PPF) एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम नसते. (PPF Investment)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पीपीएफमध्ये गुंतवणुकीत जोखीम खुप कमी असते, कारण यास सरकारचे पूर्ण संरक्षण आहे. यामध्ये गुंतवणूक केल्याने चांगला नफा सुद्धा मिळू शकतो. केवळ सावधगिरीने गुंतवणुक करण्याची गरज आहे.

 

मोठ्या कालावधीत गुंतवणूक करून पीपीएफमधून चांगला रिटर्न मिळवता येऊ शकतो. केवळ 1000 रुपये दर महिना जमा करून 12 लाख रुपयांपेक्षा जास्त रुपये मिळवू शकता. याची सुरुवात 1968 मध्ये राष्ट्रीय बचत संघटनेने एक छोटी बचत म्हणून केली होती.

किती मिळते व्याज
केंद्र सरकार प्रत्येक तिमाहीत पीपीएफ खात्यावरील व्याजदरात बदल करते. व्याजदर सामान्यतः 7 टक्के ते 8 टक्के असतो, जो आर्थिक स्थितीनुसार थोडा वाढू किंवा कमी होऊ शकतो. सध्या, व्याजदर 7.1 टक्के आहे, जो वार्षिक चक्रवाढ आहे. ही रक्कम अनेक बँकांच्या मुदत ठेवींपेक्षा (Fixed Deposit) जास्त आहे. (PPF Investment)

 

तुम्ही PPF खात्यात दरवर्षी किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. त्याचा मॅच्युरिटी पिरियड 15 वर्षे आहे. यानंतर, हे पैसे काढू शकता किंवा दर 5 वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करू शकता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काय आहे संपूर्ण योजना
जर पीपीएफ खात्यात (PPF Account) दर महिन्याला 1000 रुपये जमा केले तर 15 वर्षांत गुंतवणूक रक्कम 1.80 लाख रुपये होईल. यावर 1.45 लाख रुपये व्याज मिळेल. म्हणजेच मॅच्युरिटीनंतर एकूण 3.25 लाख रुपये मिळतील. यानंतर PPF खाते आणखी 5 वर्षे वाढवल्यास आणि दरमहा रु 1000 गुंतवत राहिल्यास, एकूण गुंतवणूक रक्कम रु. 2.40 लाख होईल. या रकमेवर 2.92 लाख रुपये व्याज मिळणार आहे. अशा प्रकारे मॅच्युरिटीनंतर 5.32 लाख रुपये मिळतील.

 

जर 15 वर्षांच्या (एकूण 30 वर्षे) मॅच्युरिटी कालावधीनंतर 5-5 वर्षांसाठी ती तीनदा वाढवली आणि
दरमहा रु. 1000 ची गुंतवणूक करत राहिल्यास गुंतवलेली एकूण रक्कम रु.3.60 लाख होईल.
यावर 8.76 लाख व्याज मिळणार आहे. अशा प्रकारे एकूण 12.36 लाख रुपये मॅच्युरिटीवर उपलब्ध होतील.

गरज भासल्यास कर्ज घेऊ शकता
पीपीएफमध्ये गुंतवणूक केली असेल, तर या खात्यावर कर्ज घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
पण ही सुविधा खाते उघडण्याच्या तिसर्‍या किंवा सहाव्या वर्षी उपलब्ध होते. PPF खात्याची 6 वर्षे पूर्ण झाल्यावर, थोडे पैसेही काढू शकता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- PPF Investment | ppf investment 1000 rupee per month you will get back 12 lakhs detail scheme

 

हे देखील वाचा :

Life Certificate | पेंशनर्सला मोठा दिलासा ! आता तुम्ही ‘या’ तारखेपर्यंत जमा करू शकता हयातीचा दाखला, जाणून घ्या सविस्तर

Restrictions in Maharashtra | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे लॉकडाऊनबाबत मोठं विधान, म्हणाले – ‘सध्या…’

Pune Crime | पुण्याच्या फरासखान्यातील पोलिसाने दिली ‘दत्तवाडी’च्या पोलिसाची ‘गेम’ करण्यासाठी ‘सुपारी’, सराईत गुन्हेगार गजाआड, प्रचंड खळबळ

 

Related Posts