IMPIMP

Life Certificate | पेंशनर्सला मोठा दिलासा ! आता तुम्ही ‘या’ तारखेपर्यंत जमा करू शकता हयातीचा दाखला, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Life Certificate | good news for for pensioners life certificate last date to submit extended to 28 feb 2022 check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Life Certificate | नवीन वर्षापूर्वी पेन्शनधारकांना (Pensioners) सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारच्या (Central Government) पेन्शनधारकांसाठी हयातीचा दाखला म्हणजेच जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आता पेन्शनधारक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यांचा हयातीचा दाखला सादर करू शकतात. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालय,
निवृत्तीवेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभाग यांनी या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे.

 

निवेदनात म्हटले आहे की, विविध राज्यांमध्ये सुरू असलेली कोविड-19 महामारी पाहता, आता सर्व वयोगटातील पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करण्याची कालमर्यादा 31.12.2021 च्या पुढे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

28 फेब्रुवारीपर्यंत हयातीचा दाखला द्या
विभागाने म्हटले आहे की आता केंद्र सरकारचे सर्व पेन्शनधारक 28/02/2022 पर्यंत हयातीचा दाखला सादर करू शकतात. या वाढीव कालावधीत, पेन्शन वितरण अधिकार्‍या (PDAs) द्वारे कोणत्याही व्यत्ययाशिवाय पेन्शन देणे सुरू ठेवले जाईल. मंत्रालयाने म्हटले आहे, की जीवन प्रमाणपत्रासाठी गर्दी टाळणे आणि कोविड-19 चे नियम पाळणे अपेक्षित आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

येथे सादर करू शकता हयातीचा दाखला
पेन्शन वितरण प्राधिकरण (PDA) जसे की बँका, पोस्ट ऑफिस आणि इतरांकडून पेन्शन प्राप्त करणारे पेन्शनधारक घरीसुद्धा जीवन प्रमाणपत्र देऊ शकतात.
निवृत्तीवेतनधारक त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र PDA ला वैयक्तिकरित्या किंवा ऑनलाइन सबमिट करू शकतात.

 

 

Web Title :- Life Certificate | good news for for pensioners life certificate last date to submit extended to 28 feb 2022 check details

 

हे देखील वाचा :

Restrictions in Maharashtra | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे लॉकडाऊनबाबत मोठं विधान, म्हणाले – ‘सध्या…’

Pune Crime | पुण्याच्या फरासखान्यातील पोलिसाने दिली ‘दत्तवाडी’च्या पोलिसाची ‘गेम’ करण्यासाठी ‘सुपारी’, सराईत गुन्हेगार गजाआड, प्रचंड खळबळ

Gold Price | नवीन वर्षात सोने खरेदी करण्याची चांगली संधी, सोन्याच्या किमतीत 6 वर्षात सर्वात मोठी घसरण

 

Related Posts