IMPIMP

Pune Corona | पुणेकरांनो सावधान ! दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोकं ‘कोरोना’बाधित

by nagesh
Covid-19 In India | 5 lifestyle changes to stay healthy amid covid 19

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनराज्यात कोरोनाचे (Coronavirus in Maharashtra) रुग्ण वाढत असताना पुण्यात देखील कोरोनाच्या (Pune Corona) दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. नुकतीच पुणे महापालिकेची (Pune Corporation) कोरोना आढावा बैठक पार पडली. यामध्ये दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोक कोरोनाबाधित होताना दिसून येत असल्याचे समोर आले आहे. या बैठकीमध्ये पुण्यातील कोरोनाच्या (Pune Corona) सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

27 डिसेंबर ते 1 जानेवारी या पाच ते सहा दिवसांत पुण्यात कोरोना (Pune Corona) रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मागील आठ दिवसात
पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या चौपट झाल्याचे समजते. नव्याने बाधित झालेल्यांपैकी लसीकरण (Vaccination) झालेल्यांची
माहिती घेतली जात असून 80 टक्के लोक दोन्ही डोस घेतलेले बाधित होताना पहायला मिळत असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor
Muralidhar Mohol) यांनी आढावा बैठकीत सांगितलं आहे.

 

मागील आठ दिवसात वाढलेल्या रुग्ण संख्येचा आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितले. महापालिका त्या अर्थानं सुसज्ज असल्याचेही महापौर मुरलीधर मोहोळ
यांनी सांगितले. जम्बोचे स्टक्चरल ऑडिट (Jumbo Structural Audit) केले आहे. 24 तासात मशिनरी सुरु होईल याचे नियोजन करण्यात आले असून गरज भासली तर सुरु होणार, असेही त्यांनी सांगितले. तसेच 80 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. तर 340 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती महापौरांनी आढावा बैठकीत दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

निर्बंधांची कडक (Strict Restriction) अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून क्वारंटाईनसाठी (Quarantine) पुन्हा हॉटेल सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय लसीकरण राहिलेल्या लोकांपर्यंत तातडीने पोहोचणं यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील, असेही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

 

Web Title : Pune Corona | 80 percent people infected who took both doses corona review meeting of pune municipal corporation mayor muralidhar mohol

 

हे देखील वाचा :

Sleeping On Stomach | तुमच्या मुलांना देखील आहे पोटावर झोपून वाचण्याची आणि खेळण्याची सवय? सावधान, नंतर होऊ शकतात ‘या’ 5 गंभीर समस्या..

Corona Vaccination in India | भारताची लसीकरण मोहिमेत चमकदार कामगिरी; अमेरिका, इंग्लंड सारख्या बलाढ्य देशांनाही टाकलं मागे

Restrictions in Pune | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नवे निर्बंध लागणार? महापौर मोहोळ यांची उद्या अजित पवारांसोबत बैठक

 

Related Posts