IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 182 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 116 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज (बुधवार) पुणे शहरातील कोरोनाच्या (Pune Corona) नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या दोन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 182 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 132 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 01 हजार 972 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 91 हजार 365 इतके रुग्ण बरे (Pune Corona) झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 08 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 02 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 05 रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9043 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुण्यात 1564 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 1564 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 189 रुग्ण गंभीर आहेत. तर 231 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7427 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आजपर्यंत 34 लाख 9 हजार 441 प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
(Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title : Pune Corona | Diagnosis of 182 corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics 

 

हे देखील वाचा :

Amazon Scam | ॲमेझॉनच्या 8,546 कोटी भ्रष्टाचाराचा पंतप्रधानांनी देशाच्या जनतेसमोर खुलासा करावा (व्हिडिओ)

Digital Media | मंत्री राजेश टोपे आणि अमित देशमुख यांच्याकडून डिजिटल मीडियाचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही

Nagpur ZP Election Results | नागपूर जि.प.च्या सर्व 16 जागांचे निकाल हाती; काॅग्रेसची बाजी, भाजपला ‘दणका’

 

Related Posts