IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 83 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona | Diagnosis of 444 patients of Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज (गुरुवार) पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आसपास आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या दीड हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 83 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 69 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 04 हजार 099 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 94 हजार 180 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 04 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 01 तर पुणे महापालिका (Pune Corporation) हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9074 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुण्यात 845 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 845 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Pune Corona) आहेत. यामध्ये 131 रुग्ण गंभीर आहेत.
तर 116 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4961 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 35 लाख 34 हजार 988 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

पुणे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 98.07 %
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 50 हजार 179 रुग्णांपैकी 11 लाख 27 हजार 988 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण 3 हजार 217 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 974 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 98.07 टक्के आहे.

 

Web Title :- Pune Corona | Diagnosis of 83 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘खा. सुजय विखेंना चांगला जावई मिळेल’ – चंद्रकांत पाटील

Neha Kakkar | लोकप्रिय सिंगर नेहा कक्कर ‘या’ गंभीर आजाराने चिंतेत

Anti Corruption Bureau kolhapur | 5 हजाराची लाच घेताना बांधकाम विभागातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Amol Mitkari | ‘भाजपचा पैसा घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा’ – अमोल मिटकरी

 

Related Posts