IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात ‘कोरोना’च्या 77 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 41 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरात कोरोना (Pune Corona) नियंत्रणात आला असून दैनंदिन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मध्यंतरी रुग्णांच्या संख्येत चढ-उतार झाल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या आठशेच्या आसपास स्थिरावली आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण (Fatality Rate) कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहरात आज दुपारी चार वाजेपर्यंत कोरोनाच्या (Pune Corona) 33 रुग्णांचे निदान झाले आहे. त्याचवेळी 77 रुग्ण बरे (Recover) झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुण्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या होती. मात्र, आता पुण्यातील नवीन रुग्णांची (Pune Corona) संख्या कमी झाल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 830 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आजपर्यंत शहरात 9 हजार 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये काही रुग्णांना आधिपासूनच वेगवेगळे आजार होते. (Pune Corona)

 

गेल्या 24 तासात तपासण्यात आलेल्या 4,269 प्रयोगशाळा तपासणीत 33 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शहरात आतापर्यंत 37 लाख 97 हजार 735 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
यामध्ये 5 लाख 08 हजार 323 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
त्यापैकी 4 लाख 98 हजार 384 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरातील विविध रुग्णालयांत सध्या 81 गंभीर रुग्णांवर उचार सुरु आहेत. तर 66 रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरु आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Pune Corona | Discharge of 77 patients of ‘Corona’ in Pune city, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पिंपरी चिंचवडमध्ये कोयत्याचा धाक दाखवून दारुचे दुकान लुटले

Hema Malini | शिवसेना नेते गुलाबराव पाटलांच्या वादग्रस्त विधानावर थेट हेमा मालिनींनी दिलं उत्तर; म्हणाल्या…

Deepika Padukone Bold Bikini Photo | दीपिकानं बिकिनी घालून केली चित्रपटाची घोषणा, सोशल मीडियावर रंगल्या तुफान चर्चा

 

Related Posts