IMPIMP

Pune Corona Updates | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 5271 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Great relief to the people of Pune The number of active patients of Corona is within a thousand know other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – पुणे शहरामध्ये कोरोनाचे (Pune Corona Updates) रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Updates) 2 हजार 075 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 5 हजार 271 रुग्ण बरे झाले आहेत. मागील काही दिवसांपासून शहरातील नवीन रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 43 लाख 45 हजार 792 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहे.
यामध्ये 6 लाख 41 हजार 495 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Updates) आढळून आले आहे.
त्यापैकी 6 लाख 05 हजार 529 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 09 तर हद्दीबाहेरील 08 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 254 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 26 हजार 712 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 308 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 49 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 30 रुग्ण आहेत. एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 4.42 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Updates | Comfortable Discharge of 5271 corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 3570 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

PMC Draft ward Structure | पुणे महापालिका ! प्रभाग रचनेचे भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून स्वागत तर मनसेने केले आंदोलन

Tejasswi Prakash – Karan Kundrra Marriage Announcement | लवकरच तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा अडकणार लग्नबंधनात? अभिनेत्याच्या वडिलांनी केला खुलासा

 

Related Posts