IMPIMP

PMC Draft ward Structure | पुणे महापालिका ! प्रभाग रचनेचे भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून स्वागत तर मनसेने केले आंदोलन

by nagesh
Pune PMC News | Strict enforcement of plastic bag ban! On the first day itself, PMC took action against 14 traders and seized 391 KG plastic bags Single Use Plastic Ban

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन आगामी महापालिका (Pune Corporation) निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना (PMC Draft ward Structure) जाहीर होताच ‘राजकिय’ धुराळा उडू लागला आहे. सत्ताधारी भाजपने पुन्हा १०० हून अधिक नगरसेवकांसह सत्तेत येउ (PMC Elections) असा दावा केला आहे, तर प्रमुख विरोधक राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) १२२ जागांवर विजयी होउ अशी घोषणा करत स्वबळाचा नारा दिला आहे. मात्र, अस्तित्वासाठी झगडणार्‍या मनसेने (MNS) भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने केवळ सत्तेसाठी राजकिय हस्तक्षेप करून प्रभागांची मोडतोड केल्याचा आरोप करत आंदोलन केले आहे. (PMC Draft ward Structure)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भाजपची पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी, गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या माध्यमातून केलेला नियोजनबध्द विकास, पुणेकरांचा दृढ विश्वास आणि सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या राज्यातील महविकास आघाडी सरकारवरील (Maha Vikas Aghadi Government) जनतेचा रोष यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या १०० हून अधिक जागा निवडून येतील. महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत कलहामुळे प्रारूप प्रभाग रचना (PMC Draft ward Structure) करताना त्यांच्यामध्ये एकवाक्यता नव्हते. प्रभागांची तोफडो करण्यात आली आहे.

– जगदीश मुळीक, शहर अध्यक्ष, भाजप.
(- Jagdish Mulik, City President, BJP)

 

 

स्वागतार्ह प्रभाग रचना आहे. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. नैसर्गिक सीमांचे पालन झाले आहे. १७३ पैकी १२२ जागा आम्ही जिंकू. राष्ट्रवादी ने स्वबळावर निवडणूक लढवावी ही शहर अध्यक्ष म्हणून माझी मागणी आहे. परंतु आघाडी व त्याबाबतचे निर्णय पक्ष श्रेष्ठी घेतील. प्रभाग रचनांची फोडाफोडी ही बीजेपी ची परंपरा आहे. आमच्याकडे १६ विद्यमान नगरसेवक येण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीची उमेदवारी यादी सर्वप्रथम जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील. ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित होईल असा विश्वास आहे. राज्य शासन यासाठी प्रयत्न करत आहेत. आम्ही आरक्षणा नुसार ओबीसी उमेदवारांना तिकीट देऊ.

– प्रशांत जगताप, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी.
(- Prashant Jagtap, City President, Nationalist Congress Party)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

प्रभाग रचना करताना मोठ्याप्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा आमचा संशय आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी व भाजप या दोघांच्या वादात शहरातील प्रभागांच्या रचना नैसर्गिक सीमा न पाहता केल्या. केवळ अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी हा प्रताप करण्यात आला आहे. पुण्यात ही कुप्रथा सुरू झाली असून यामुळे पुणेकरांचे हाल होत आहेत. मध्यवर्ती भागातील १६ प्रभागांचा खून केला आहे. याचा आम्ही निषेध करतो. याविरोधात आम्ही हरकती सूचना दाखल करणार आहोत. आजचे आंदोलन हे महाविकास आघाडी आणि भाजपच्या कार्यपद्धती विरोधात करण्यात आले.

– मनसेचे पदाधिकारी बाबू वागस्कर (Babu Wagaskar), वसंत मोरे (Vasant More), वनिता वागस्कर (Vanita Wagaskar), साईनाथ बाबर (Sainath Babar)

 

 

Web Title :- PMC Draft ward Structure | Pune Municipal Corporation! Ward formation was welcomed by BJP, NCP; Protest by MNS

 

हे देखील वाचा :

Tejasswi Prakash – Karan Kundrra Marriage Announcement | लवकरच तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा अडकणार लग्नबंधनात? अभिनेत्याच्या वडिलांनी केला खुलासा

Rinku Rajguru Boyfriend | अखेर रिंकू राजगुरुला सापडला खऱ्या आयुष्यातील ‘परशा’, सोशल मीडियावर रंगल्या अफेरच्या चर्चा

Kangana Ranaut | So Hot ! म्हणत कंगना रानौतनं शेअर केला नवाजुद्दीन सिद्दिकीचा ‘आइटम गर्ल’च्या वेशातील फोटो..

 

Related Posts