IMPIMP

Pune Corporation Election | आगामी पुणे मनपा निवडणुकीत ‘महाविकास’ एकत्रित तर मनसे देखील भाजप-रिपाइंशी युती करण्याची शक्यता वाढली; एमआयएम आणि आम आदमी पार्टीची ‘अडचण’

by nagesh
Pune Corporation Election | In the forthcoming Pune Municipal Corporation elections, the possibility of forming an alliance of shivsena-congress-ncp; mns may be go with BJP-RPI ; MIM and Aam Aadmi Party's 'problem'

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corporation Election | तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे आगामी पुणे महापालिका निवडणुकीमध्ये (Pune Corporation Election) महाविकास आघाडी (maha vikas aghadi) एकत्रित तर मनसे (MNS) देखील भाजप – रिपाइं (BJP-RPI) युती करण्याची शक्यता वाढली आहे. तर त्याचवेळी मागील निवडणुकीमध्ये खाते उघडणाऱ्या एमआयएम (MIM) आणि यंदा खाते उघडण्याच्या प्रयत्नांत असलेल्या आम आदमी पार्टीची (AAP) मात्र अडचण झाली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

राज्य निवडणूक आयोगाने नुकतेच आगामी महापालिका निवडणुकांसाठी (Pune Corporation Election) एक सदस्यीय पद्धतीने वॉर्ड रचना करण्याचे आदेश दिले होते.
हे आदेश दिले गेले असले तरी राज्यातील शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) महाआघाडी सरकार प्रमुख महापलिकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी बहुसदस्यीय प्रभाग रचना करतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असलेले राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दोन सदस्यीय प्रभागसाठी प्रयत्नशील होते.
त्यांचे राजकीय कसब दाखवून ते नक्कीच हा निर्णय करवून आणतील असा विश्वास राजकीय वर्तुळात होता. त्यामुळेच किमान पुण्यातील शिवसेना, मनसेसह राष्ट्रवादी काँग्रेससह एमआयएम (MIM), आम आदमी पार्टीतुन (AAP) निवडणुकीसाठी जोरदार बांधणी सुरू केली गेली.

 

दरम्यान काल मंत्रिमंडळ बैठकी मध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचना मान्य करण्यात आल्याने आघाडी व युत्यांचे चित्र बदलणार असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
तीन सदस्यीय रचनेमुळे पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
उपनगरांमध्ये याचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला होईल.
प्रामुख्याने येरवडा (Yerwada), वडगाव शेरी (vadgaon sheri), कोंढवा (Kondhwa),
हडपसर (Hadapsar), शिवाजीनगर (Shivajinagar), बिबवेवाडी (Bibvewadi),
आंबेगाव (Ambegaon) , सिंहगड रस्ता (Sinhagad Road), रास्ता पेठ (Rasta Peth)
परिसरात जेथे भाजपने (BJP) मागील निवडणुकीत यश संपादन केले होते तेथे आघाडीच्या
माध्यमातून यश मिळवण्याचा प्रयत्न राहील.
तर मध्यवर्ती शहरातील पूर्व भाग, पर्वती मतदारसंघात (parvati vidhan sabha constituency) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ला आघाडी मुळे चांगले यश मिळेल अशी शक्यता महाविकास आघडीच्या गोटातून व्यक्त केली जात आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

मनसे ने मागील वर्षभरापासून हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतल्याने त्यांची भाजपसोबत जवळीक वाढली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आगामी निवडणुकीसाठी पुण्यामध्ये विशेष लक्ष घातले आहे.
त्याचवेळी मनसे ची भाजपसोबत (BJP) जवळीक देखील वाढली आहे.
शहरातील अस्तित्व टिकवण्यासाठी प्रसंगी भाजपसोबत युती करण्याची स्थानिक कार्यकर्त्यांची
इच्छा लपून राहिलेली नाही.
तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीत हे अस्तीत्व टिकवायचे असेल तर भाजप सोबत युतीशिवाय पर्याय नाही.
ही मानसिकता अधिकच प्रबळ झाली आहे.
मनसे ची कोथरूड, कसबा आणि कात्रज परिसरात काहीशी ताकत आहे.
याचा फायदा नक्कीच मनसे सोबत भाजपलाही होणार आहे.

परंतु कोथरूड (Kothrud) आणि कसब्यात (kasba vidhan sabha constituency)
भाजपचे नगरसेवक (bjp corporator) आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते असताना मनसेला
जागा वाटपात संधी मिळणार ? हा खरा प्रश्न आहे.
यासोबतच मुंढवा (Mundhwa) , येरवडा आणि बोपोडी (Bopodi) सारख्या ठिकाणी भाजप
आणि रिपाइं अशी युतीच्या इच्छुकांचा भरणा असताना मनसेच्या वाटयाला किती जागा येणार अशीही अडचण निर्माण होणार आहे.
त्यामुळे मनसे चे भाजप सोबत युतीचे गणित काहीसे अवघड होण्याचे चिन्ह आहे.

 

दुसरीकडे मागील निवडणुकीमध्ये येरवडा येथून खाते उघडणाऱ्या एमआयएम ने सत्तेत भाजपला पाठिंबा दिला आहे.
परंतु एमआयएम च्या एकमेव नगरसेविका पक्ष म्हणून फारसा प्रभाव पाडू शकल्या नाहीत.
केवळ निवडणुकीच्या वेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ची वोट बँक फोडणे एवढीच काय ती उपयोगिता ठरली. तसेच दिल्ली व उत्तरेकडील काही राज्यात अरविंद केजरीवाल यांच्या प्रभावामुळे देशपातळीवर नावारूपास आलेल्या आम आदमी पार्टीने मागील निवडणुकी पासून पुण्यात अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आहे. एकवेळ पक्ष आणि उमेदवाराचा प्रभाव यामुळे एक सदस्यीय वॉर्ड मध्ये हा पक्ष काही भागात निवडणुकीचे चित्र पालटू शकला असता.
मात्र तीन सदस्यीय प्रभागात ही चुणूक दाखवण्या इतपत अद्याप म्हणवसा प्रभाव निर्माण करू शकलेले नाहीत.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title : Pune Corporation Election | In the forthcoming Pune Municipal Corporation elections, the possibility of forming an alliance of shivsena-congress-ncp; mns may be go with BJP-RPI ; MIM and Aam Aadmi Party’s ‘problem’

 

हे देखील वाचा :

Experts-Advice | जीन्स महिन्यातून एकदा आणि ब्रा आठवड्यातून एकदा धुवा, एक्सपर्ट देतात असा सल्ला; जाणून घ्या का?

OBC Reservation | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत OBC ला 27 % आरक्षण

Pune Crime | 13 वर्षाच्या मुलीला फूस लावून पळवून नेलं; अश्लिल व्हिडिओ पाठविणारे तिघे आले चांगलेच ‘गोत्यात’

 

Related Posts