IMPIMP

Pune Corporation | प्रशासक म्हणून महापालिका आयुक्तांचा पहिलाच दणका ! वाहतूक गतिमान करण्यासाठी पदपथ, रस्ते आणि इमारतींच्या साईड मार्जीनमधील बेकायदा व्यवसायांवर कारवाई करणार

by nagesh
Pune PMC News | Strict enforcement of plastic bag ban! On the first day itself, PMC took action against 14 traders and seized 391 KG plastic bags Single Use Plastic Ban

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corporation | नगरसेवकांचा कार्यकाळ सोमवारी संपुष्टात आल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी आज प्रशासकपदाची (PMC Administrator) सुत्रे हाती घेतली आहेत. पहिल्याच दिवशी शहरातील पदपथ आणि मोकळ्या जागांवर बेकायदेशीररित्या व्यवसाय करून विद्रुपीकरणात भर घालणार्‍या अनधिकृत व्यावसायीकांना दणका दिला आहे. पदपथ आणि इमारतींच्या ओपन स्पेसवर (Open Space) सुरू असलेले बेकायदा व्यवसाय (Illegal Business) आणि अतिक्रमणे (Encroachments) तातडीने काढून घ्यावेत अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. (Pune Corporation)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

महापालिकेच्या नगरसेवकांची सोमवारी (दि.१४ मार्च) मुदत संपली आहे. आजपासून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे कामकाज पाहाणार आहेत. पहिल्याच दिवशी विक्रम कुमार यांनी शहरातील रस्ते आणि मोकळे करण्यास प्राधान्य दिले आहेत. पदपथ, रस्त्यांच्या कडेला आणि इमारतींच्या साईड, फ्रंट मार्जीनमध्ये सुरू असलेले पथारी व्यवसाय, हॉटेल्स व अन्य व्यवसाय तातडीने बंद करावेत. तसेच यासाठी उभारण्यात आलेले तात्पुरते मंडप, स्ट्रक्सर्च संबधित व्यावसायीकांनी काढून घ्यावेत, असे आदेश दिले आहेत. यानंतरही बेकायदा व्यावसायीक आढळल्यास त्यांच्यावर अतिक्रमण विभागाच्यावतीने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Pune Corporation)

 

यासंदर्भात बोलताना अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (PMC Deputy Commissioner of Encroachment Madhav Jagtap) यांनी सांगितले, की शहरातील अनेक रस्ते व पदपथांवर बेकायदा व्यावसायीकांमुळे वाहतुकीला आणि पादचार्‍यांनाही अडथळा होत आहे. तसेच अनेक इमारतींच्या ओपनस्पेसवर हॉटेल व अन्य व्यवसाय सुरू आहेत. याबाबतही नागरिकांकडून तक्रारी येत असतात. या पार्श्‍वभूमीवर शहरातील रस्ते व पदपथ मोकळे करून वाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी आयुक्तांच्या आदेशानुसार लवकरच जोरदार कारवाई सुरू करण्यात येणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शहरात मोेठयाप्रमाणावर बेकायदेशीररित्या फ्लेक्स, बॅनर, झेंडे लावण्यात आले आहेत. हे सर्व फ्लेक्स, बॅनर व झेंडे काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती आकाशचिन्ह विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

 

शहरातील अनेक रस्त्यांवर विविध राजकिय पक्ष आणि संघटनांनी कार्यालये थाटली आहेत.
अनेक ठिकाणी तर नगरसेवकांनी पदपथावर महापालिकेच्या निधीतून वाचनालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टे उभारले आहेत.
ही स्ट्रक्चर्स देखिल वाहतूक आणि पादचार्‍यांसाठी अडथळा ठरत आहेत.
यावर कारवाई करणार? याबाबत विचारले असता माधव जगताप यांनी पदपथांवरील बेकायदा कार्यालये, वाचनालये देखिल हटविण्यात येतील.
मात्र, महापालिकेच्या निधीतून उभारण्यात आलेली वाचनालये व अन्य सुविधा हटविण्याबाबत महापालिका आयुक्तांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

 

Web Title :- Pune Corporation | PMC Municipal Commissioner’s first blow as administrator! Illegal businesses in side margins of sidewalks, roads and buildings will be cracked down on to speed up traffic

 

हे देखील वाचा :

Pune Crime | अंगठी खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या आंबेगाव पठार परिसरातील 20 आणि 21 वर्षीय मुलींना सहकारनगर पोलिसांकडून अटक

Madras High court | ऑफिसमध्ये खासगी कामासाठी मोबाईल वापरल्यास जाऊ शकते नोकरी, हायकोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात ‘या’ 5 गोष्टी खायला सुरूवात करा, वृद्धत्वापर्यंत शरीरात वाढणार नाही कोलेस्ट्रॉल

 

Related Posts