IMPIMP

Pune Crime | अंगठी खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या आंबेगाव पठार परिसरातील 20 आणि 21 वर्षीय मुलींना सहकारनगर पोलिसांकडून अटक

by nagesh
Woman Arrest

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | ज्वेलर्सच्या दुकानात (Jewelers Shop) अंगठी खरेदी करण्याच्या बहाणा करुन सोनाराची नजर चुकवून अंगठी चोरणाऱ्या (Gold Ring Thieves) दोन मुलींना सहकारनगर पोलिसांनी (Sahakarnagar Police) अटक (Arrest) केली आहे. आरोपी तरुणींनी गुरुवारी (दि.10) पारख ज्वेलर्समध्ये (Parkh Jewelers) सोन्याची अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने अंगठी चोरुन नेली होती. याबाबत आनंद हरीलाल पारख Anand Harilal Parakh (वय – 47 रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद (Pune Crime) दिली होती. सहकारनगर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन आंबेगाव पठार परिसरातील 20 आणि 21 वर्षीय मुलींना अटक केले आहे.. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सहकारनगर पोलिस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर तपास पथकाचे पोलीस अधिकारी बापु खेंगरे (Bapu Khengare) व तपास पथकाने आरोपींचा शोध सुरु केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील 70 ते 75 सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी दुकानातुन आंगठी चोरून पळून जाणाऱ्या दोन मुली एका ॲक्टिवा गाडीवरुन एलोरा पॅलेस (Ellora Palace) कडून सातारा रोडने कात्रजकडे (Satara Road Katraj) जाताना दिसल्या. गाडीचा शोध घेतला असता गाडी आंबेगाव पठार येथील असल्याची माहिती मिळाली. तसेच आरोपी तरुणी या नारायणीनगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली.

 

त्यानुसार पथकाने परिसरात सापळा रचून दोघींना ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून 45 हजार रुपये किमतीची 8 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी 20 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सहकारनगर आणि स्वारगेट पोलीस ठाण्यातील (Swargate Police Station) दोन गुन्हे उघडकीस आली आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil),
सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई (Senior Police Inspector Swati Desai)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अधिकारी बापु खेंगरे (PSI Bapu Khengare),
पोलीस अंमलदार बापु खुटवड, महादेव नाळे, भुजंग इंगळे, सागर सुतकर, महेश मंडलिक, प्रदीप बेडीस्कर,
महिला पोलीस अंमलदार रेखा यादव यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Sahakar Nagar Police arrest 20 and 21 year old girls from Ambegaon Pathar area for stealing goldan rings

 

हे देखील वाचा :

Madras High court | ऑफिसमध्ये खासगी कामासाठी मोबाईल वापरल्यास जाऊ शकते नोकरी, हायकोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात ‘या’ 5 गोष्टी खायला सुरूवात करा, वृद्धत्वापर्यंत शरीरात वाढणार नाही कोलेस्ट्रॉल

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 12 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts